मुंबई : आज राज्याचं अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहे. काल विधीमंडळात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. त्यावरून आज सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.
हेही वाचा..“कसब्याच्या विजयानंतर पुण्यातील ३ मतदारसंघ डेंजरझोनमध्ये, भाजपची धाकधुक वाढली”
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने’द्वारे (मनरेगा) प्रती कुटुंब पुरवण्यात आलेला सरासरी रोजगार ४१ दिवसांवरून ३५ दिवसांवर आल्याचं कालच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आलंय. योजनेतील अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांची रोजगारातील टक्केवारीही सातत्याने घसरतेय. आजच्या अर्थसंकल्पात ‘मनरेगा’ साठी भरीव तरतूद करून प्रती कुटुंब सरासरी १०० दिवस रोजगार दिला जाईल, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा…शरद पवारांनी दिला भाजपला बिनशर्त पाठिंबा, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच..असं काही घडलं की..
राज्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींची वारंवारता बघता वित्त आयोगानुसार आपल्या राज्याला ॲलोकेट झालेला ४५०० कोटी रुपये निधी पुरेसा नाही. नैसर्गिक आपत्तीत सावरण्यासाठी आणि लोकांना नुकसान भरपाई देण्यासाठी लागणारा निधी लक्षात घेऊन यंदाच्या अर्थसंकल्पात नैसर्गिक आपत्तीसंदर्भात गांभीर्याने विचार करावा. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना महागाईचा सर्वाधिक फटका बसत असून, सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीच्या रकमाही वाढत्या महागाईला अनुसरून वाढवणं गरजेचं आहे. घरकुल योजनांचं अर्थसहाय्य तसंच घरकुलांची संख्या वाढवणंही गरजेचं आहे.
हेही वाचा…महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल फडणवीसांकडून सादर,उद्या अर्थसंकल्प सादर होणार
दरम्यान, सध्या ०.४ ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेल्या आपल्या महाराष्ट्राला २०३० पर्यंत १ ट्रिलीयन डॉलर्सचा टप्पा गाठण्यासाठी किमान १२.५ % विकासदर आवश्यक आहे. परंतु कालच्या आर्थिक पाहणी अहवालात २०२३-२४ साठीचा विकासदर ६.८% दाखवण्यात आला आहे. आर्थिक विकासदर वाढवण्यासाठी सरकारला अधिकाधिक FDI आणावी लागेल आणि भांडवली खर्चावरही भर द्यावा लागेल.
सध्या ०.४ ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेल्या आपल्या महाराष्ट्राला २०३० पर्यंत १ ट्रिलीयन डॉलर्सचा टप्पा गाठण्यासाठी किमान १२.५ % विकासदर आवश्यक आहे. परंतु कालच्या आर्थिक पाहणी अहवालात २०२३-२४ साठीचा विकासदर ६.८% दाखवण्यात आला आहे. आर्थिक विकासदर वाढवण्यासाठी सरकारला… https://t.co/XCFxvpCk1D
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 9, 2023
Read also
- हेही वाचा..पन्नास खोके अन् नागालॅंड ओक्के, विधानसभेत नागालॅंडचा मुद्दा, सत्ताधारी विरोधक आमनेसामने
- हेही वाचा…“राज साहेब अतिशय दिलदार मनाचा राजा माणूस”, जुने ऋणानुबंध जुळले, धंगेकरांची प्रतिक्रिया
- हेही वाचा…“दाढी अन् मिशा आल्या म्हणजे अक्कल येते, असं काही नाही”
- हेही वाचा..भुजबळांनी शिंदेंना डिवचलं, एकनाथ शिंदेंनी अॅक्शन करत दिलं उत्तर, सभागृहात मोठा गोंधळ
- हेही वाचा..अश्विनी जगताप अन् रवींद्र धंगेकरांनी घेतली शपथ, विधानभवनात आता आवाज घुमणार