नागपुर : राज्यातील हिवाळी अधिवेशन बऱ्याच कालावधीनंतर नागपुरला होणार आहे. येत्या एक दोन महिन्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलंच अधिवेशन पार पाडणार आहे. यातच हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाला मोठा धक्का देणार असून आठ जिल्हाप्रमुख शिंदे गटात येणार असल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमणे यांनी केला आहे. त्यामुळे अजून एक धक्का उद्धव ठाकरे शिंदे देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
“हा माझ्या भावावर अन्याय आहे..;” सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठराखण
राज्यात सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेनेचे सरकार सुरू आहे. याकाळात एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या विकासासाठी घेतलेले निर्णय आणि ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयांमध्ये खुप मोठा फरक आहे. मागील काही काळात एकनाथ शिंदे यांनी महत्वाचे निर्णय घेतल्याने अनेक पदाधिकाऱ्यांवर त्यांचा विश्वास बसला आहे. त्यामुळे अनेक पदाधिकारी आमच्या संपर्क असून काही दिवसानंतर ते शिंदे गटात प्रवेश करतील. असा दावा कृपाल तुमणे यांनी केला आहे.
“अफजल खानाची कबर जिजाऊंच्या आदेशाने महाराजांनी बांधली”; जितेंद्र आव्हाड
शिवसेनेतील अनेक युवासेनेतील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश मुंबईत मागील काही दिवसाआधी झाला आहे. तो प्रवेश नागपुरमध्ये होणार होता. परंतु काही पदाधिकाऱ्यांना इकडे येता आलं नाही. त्यामुळेच तिथेच झाला. तसेच येत्या काळात अनेक जिल्हाप्रमुख, काॅंग्रेसचे माजी आमदार देखील बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश करतील. हिवाळी अधिवेशात हे चित्र बघायला मिळणार असून नागपुरात भव्य मेळावा देखील होणार आहे. असंही तुमणे यांनी म्हटलं आहे.
दिपाली सय्यद यांच्याविरोधात सेनेचं पुण्यात आंदोलन..! शिंदे गटात गेल्या अन्..;
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय समीकरणं राज्यात मांडली जात आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्रित निवडणुका लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष युती करण्याची शक्यता आहे. तसेच काॅंग्रेस देखील महाविकास आघाडीसोबत निवडणुका लढण्याची आग्रही आहे.
Read also
- गडकरी, तुमणेंसह 10 खासदारांचे राजीनामे घेणार..! विदर्भ आंदोलन समिती आक्रमक
- “भाजपचे 7 मंंत्री, 15 आमदार-खासदार तुरूंगात जातील”; राऊत तुरूंगातून बाहेर येताच शिवसेनेचा इशारा
- “संजय राऊत विद्वान आहेत, त्यांना तुरूंगवास भोगावा लागला, वाईट वाटतं..;” दिपक केसरकर
- राहुल गांधींना राष्ट्रवादीची साथ..! भारत जोडो यात्रेत सुळे, जयंत पाटील अन् आव्हांडाची हजेरी
- “तर मग जितेंद्र आव्हाडांना उपोषणाला बसायचं असेल तर खुशाल बसावं”; मनसेने डिवचलं