नागपुर : राज्यात वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, यासाठी विदर्भ आंदोलन समितीने आज आंदोलनाची हाक पुकारली आहे. विदर्भातील दहा खासदारांच्या घराबाहेर विदर्भ आंदोलन समिती आंदोलन करणार असून या दहाही खासदारांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याची माहिती विदर्भ आंदोलन समितीचे अध्यक्ष अरूण केदार यांनी दिली आहे.
“अफजल खानाची कबर जिजाऊंच्या आदेशाने महाराजांनी बांधली”; जितेंद्र आव्हाड
राज्यातील विदर्भातील लोकसभेत खासदार आहेत. त्यांनी आतापर्यंत विदर्भाबाबत कोणत्याही गोष्टी लोकसभेत मांडल्या नाहीत. त्यांना विदर्भाबाबत कोणताही कळवळा आता त्यांच्यात राहिलेला नाही. त्यामुळे विदर्भातील अकरा जिल्हात आमचे जिल्हाप्रमुख त्या त्या खासदारांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व तेथील जिल्हाप्रमुख करणार असल्याचेही केदार यांनी म्हटले आहे.
दिपाली सय्यद यांच्याविरोधात सेनेचं पुण्यात आंदोलन..! शिंदे गटात गेल्या अन्..;
नितीन गडकरी, कृपाल तुमणे, नवनीत राणा यांच्यासह 10 खासदारांचे राजीनामे विदर्भ आंदोलन समिती आज मागणार आहे. आज 12 वाजता चंद्रपुरात वामनराव चटप तर नागपुरात अरूण केदार यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रम चालणार आहे. तर संपुर्ण विदर्भात तेथील जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाणार आहे.
“शिवप्रेमींवर गुन्हे दाखल झाले पण..;” अफजल खानच्या कबरीवरील कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया
दरम्यान, दोन वर्षानंतर देशात लोकसभेची निवडणुक होत आहे. त्यामुळे विदर्भातील खासदारांना घेरण्यासाठी विदर्भ आंदोलन समितीने हा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे आता यावर नितीन गडकरी यांच्यासह विदर्भातील 10 खासदार काय प्रतिक्रिया देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- “भाजपचे 7 मंंत्री, 15 आमदार-खासदार तुरूंगात जातील”; राऊत तुरूंगातून बाहेर येताच शिवसेनेचा इशारा
- “संजय राऊत विद्वान आहेत, त्यांना तुरूंगवास भोगावा लागला, वाईट वाटतं..;” दिपक केसरकर
- राहुल गांधींना राष्ट्रवादीची साथ..! भारत जोडो यात्रेत सुळे, जयंत पाटील अन् आव्हांडाची हजेरी
- “तर मग जितेंद्र आव्हाडांना उपोषणाला बसायचं असेल तर खुशाल बसावं”; मनसेने डिवचलं
- “हा माझ्या भावावर अन्याय आहे..;” सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठराखण