मुंबई : प्रतापगडाच्या पायथ्याखाली असलेल्या अफजल खानच्या कबरी जवळील अनधिकृत बांधकाम पोलिसांना रातोरात तोडलं आहे. त्यामुळे राज्यात आता नवा निर्माण झाला आहे. यावर राज्यातील राजकीय नेत्यांनी आपपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातच अफजल खानाची कबर बांधण्यासाठी जिजाऊंनीच महाराजांना आदेश दिले होते. असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. तर मनसेचे नेते अफजल खानाचे उद्दातीकरण करणाऱ्यांवरही बुलडोझर चालवला पाहिजे. असं म्हटलं आहे.
“कबरी काढून फेका..!” हिंदू महासभेची मागणी, शंभुराज देसाई म्हणाले, “धक्का पोहचू देणार नाही”
अफजल खानाची कबर जिजामातेच्या आदेशाने शिवाजी महाराजांनी बांधलीय. आता वैर संपलं असं जिजाऊंनी म्हटलं होतं. त्यानंतर ही कबर बांधलीय. इतिहासाचं विकृतीकरण करू नका हे आमचं म्हणणं आहे. जेव्हा जेव्हा लोकांना फसवायचं असतं. दिशाभूल करायची असते तेव्हा तुम्हाला धार्मिक आणि इतिहास हेच दोन आधार आहेत. त्यामुळे लोकांची डोकी फिरतात. असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
“कबरी काढून फेका..!” हिंदू महासभेची मागणी, शंभुराज देसाई म्हणाले, “धक्का पोहचू देणार नाही”
जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर त्यांना मनसेचे नेते गजानन काळे यांनी टोला हाणला आहे. ते म्हणाले की, अफजल खानाच्या कबरी समोरचे अनधिकृत बांधकाम हटवलं. अगदी तसंच अफजलखानाचे उद्दातीकरण करणाऱ्यांवरही बुलडोझर चालवला पाहिजे. अफजलाखानच्या विचारधारेचे अतिक्रमण हटेल तो सुदिन असेल. तर कारवाई विरोधात राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांना उपोषणाला बसायचं असेल तर खुशाल बसावं. असा टोला देखील त्यांनी लगावला.
“मोदींनी राहुल गांधीच्या पदयात्रेत सहभागी व्हावं..”; राजू शेट्टींचा खोचक टोला
दरम्यान, यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. आजचा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा आहे. आजच्या दिवशी अफजल खानाचा वध झाला होता. 2017 साली कोर्टानं या अफजल खानच्या थडग्याजवळ असलेले अनधिकृत बांधकाम काढले पाहिजे अशी नोटीस दिली होती. 2017 मध्ये आम्ही कारवाई सुरू केली होती. परंतु त्यात पुन्हा कायदेशीर अचडणी आल्या. आता या सर्व अडचणी दुर झाल्या असून सातत्याने शिवप्रेमींची मागणी होती, की त्याठिकाणचं बांधकाम तोडावं. शिवप्रेमींवर गुन्हे दाखल झाले. परंतु अतिक्रमण हटवलं नव्हतं. आज सगळ्यांसाठी समाधानाची गोष्ट आहे, कारण त्याठिकाणचं सगळं अतिक्रमण हटवण्यात आले आहे. असंही ते म्हणाले.
Read also
- “हा माझ्या भावावर अन्याय आहे..;” सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठराखण
- “अफजल खानाची कबर जिजाऊंच्या आदेशाने महाराजांनी बांधली”; जितेंद्र आव्हाड
- दिपाली सय्यद यांच्याविरोधात सेनेचं पुण्यात आंदोलन..! शिंदे गटात गेल्या अन्..;
- “शिवप्रेमींवर गुन्हे दाखल झाले पण..;” अफजल खानच्या कबरीवरील कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया
- “केंद्र सरकार न्यायालयालाच आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न करत असेल तर..”; ठाकरेंचा हल्लाबोल