पुणे : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर निवडणुक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार हे नाव तर तुतारी हे निवडणुक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. आज रायगडावर तुतारी या निवडणुक चिन्हाचं शरद पवार गटाकडून अनावरण करण्यात आलं. यावेळी शरद पवारांसह अनेक नेते हजेर होते. तर दुसऱ्या बाजूला आता पुण्यात शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह शरद पवार गटाच्या ९ पदाधिकारी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा..राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, भाजपने नार्वेकरांसाठी निश्चित केला ‘हा’ मतदारसंघ
निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर पुण्यात राष्ट्रवादी कार्यालयात अजित पवार यांच्या नावाची कोनशिला शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी फोडली. यानंतर डेंगळे पुल शिवाजी नगर येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरच दोन्ही गटांत मोठा वाद झाला होता. त्यावरूनच आता प्रशांत जगताप यांच्यासह ९ पदाधिकारी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा…लोकसभेसाठी महाविकास आघाडीत ‘या’ जागांवर खरी रस्सीखेच, वाचा सविस्तर
राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी लावलेली अजित पवार यांच्या नावाची कोनशीला तोडून नुकसान करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर पुण्यातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व चिन्ह गेल्यानंतर पुण्यात शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं होतं.
READ ALSO :
हेही वाचा.“तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, आम्ही ४५ जागा जिंकणारच”, भाजपच्या नेत्याने डिवचलं
हेही वाचा…“आमदार आहेस, लय गल्लीतल्या गप्पा मारू नकोस, बाजारू विचारवंत,” पवार गटाने मिटकरींची बोलतीच केली बंद
हेही वाचा…“कामाच्या बड्या बड्या बाता करणाऱ्यांना आता मात्र मिरच्या झोंबतील”, चाकणकरांनी पुन्हा सुळेंना डिवचलं
हेही वाचा…“मोदींविरोधात पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा अन् मगच…”राज्याच्या मंत्र्याने इंडिया आघाडीला दिलं आव्हान
हेही वाचाजरांगेंवर गंभीर आरोप, मराठा समाज आक्रमक, अजय बारस्कर महाराजांवर हल्ला