मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल मुंबईतील विलेपार्ले विभागातील उद्धव बाळासाहेब गटाचे माजी नगरसेवक सुभाष कांता सांवत आणि शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष मोहन गोयल यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत करून भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा…कांद्यावरून राजकारण तापलं, मुख्यमंत्र्यांच्या टिकेला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, कृषी मंत्री असतांना..,
त्यांच्यासोबत शिवसेना शाखा क्रमांक ८३ चे शाखाप्रमुख नरेश सावंत, महाराष्ट्र नाथयोगी सेवा समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष भावेश राजपूत,शाखा क्रमांक ८२ चे उपशाखाप्रमुख राजाराम यादव, शिव वाहतूक सेनेचे सचिव कल्पेश बालघरे आणि शिव वाहतूक सेनेचे उत्तर मुंबई लोकसभा संघटक मुस्तकिम शेख यांनी देखील प्रवेश केला. त्यासोबतच पनवेलचे महानगर प्रमुख ॲड. प्रथमेश सोमण यांच्या पुढाकाराने पनवेल राष्ट्रवादीच्या युवा सेलचे शहराध्यक्ष महेश सावंत, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष सिद्धेश खानविलकर, उबाठा गटाचे उसरली विभागाचे शाखाप्रमुख विवेक घाणेकर, दीपक प्रभू, सुनिल पलसमकर यांनीही यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
हेही वाचा…“केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसोबत मोठा डाव, कांद्यावरून सरकारने शेतकऱ्यांना फसवलं ?” वाचा सविस्तर
दरम्यान, अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना शासकीय अध्यादेशातील चुकीमुळे शिष्यवृत्ती मिळूनही ती हातात पडत नव्हती. याबाबत तातडीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच वर्षानुवर्षे पनवेल एसटी आगारात पदपथ विक्रेते म्हणून काम करूनही पदपथ विक्रेत्यांना ओळखपत्र मिळत नव्हते ते मिळवून दिल्याबद्दल त्यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
READ ALSO :
हेही वाचा…“शिंदेसोबत गुवाहाटीला गेल्याने आम्ही बदनाम झालो”, बच्चू कडूंनी व्यक्त केली भावना
हेही वाचा…“सिलेंडर ५०० रूपये., महिलांना महिन्याला १५०० रूपये, १०० युनीट वीज युनीट माफ,” काॅंग्रेसने ‘या’ राज्यात केल्या मोठ्या घोषणा
हेही वाचा…अजित पवारांमुळे शिंदेंच्याआमदारांची गोची अन् रामदास आठवले सांगताहेत, “आम्हालाही मंत्रिपद हवंय”
हेही वाचा…कांदा सगळ्यांनाच रडवणार, केंद्र सरकारचा फसवा डाव
हेही वाचा…नाशिकमध्ये ‘या’ गावात शेतकऱ्यांनी कांदे फेकले रस्त्यावर, निवडणुकांवर टाकला बहिष्कार