मुंबई : महाराष्ट्राला काय फडतुस उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री लाभला आहे. असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. त्यावर आता भाजपच्या नेत्यांकडूनही प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्यावर उद्धव ठाकरे मी फडतूस नही मैं काडतुस हूॅं मैं. याद रखना, झुकेगा नही, मैं तो घुसेगा असं म्हणत फडणवीसांनी त्यावर पलटवार केला आहे. त्यावर आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…भाजप-शिंदे गटात फूट? शिंदे गटाच्या मंत्र्याची भाजपवर टीका..
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस शब्द वापरल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर झुकेगा नही घुसेगा साला हा डायलॉग भारीच होता पण २०१६ पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नीवर स्पायिंग करत होती. हे तुम्हाला ७ वर्ष कळले नाही आणि तुम्ही घुसायच्या बाता कराव्यात हे काय पटत नाही राव. असं म्हणत सुषमा अंधारे यांनी त्यावर खोचक टिप्पणी केलीय.
हेही वाचा…शिंदेंचा एक आमदार बंडाच्या तयारीत, ठाकरे गटात प्रवेश करणार !
उद्धव ठाकरे आणखी बोलले तर त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. अशा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. त्यावर शिवसेनेला धमक्या देऊ नका. तुमच्या टांगा सांभाळा, तुमची जीभ चुरू चुरू चालतेय. ती फक्त इडी आणि सीबीआय असल्याने. पण सत्ता असेपर्यंतच बोलू शकाल. महाराष्ट्रात आणि दिल्लीतही तुमची सत्ता नसेल. तोपर्यंत यांच्यासारखे पोपट मिठू मिठू बोलतीय. तुमची जीभ चुरू चुरू चालतेय. असं संजय राऊतांनी म्हटलंय.
“झुकेगा नही घुसेगा साला” हा डायलॉग भारीच होता पण 2016 पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नी वर स्पायिंग करत होती हे तुम्हाला 7वर्षे कळले नाही आणि तुम्ही #घुसायच्या बाता कराव्यात हे काय पटत नाही राव !!@ShivsenaUBTComm @ShivSenaUBT_ @AUThackeray @OfficeofUT
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) April 5, 2023
Read also
हेही वाचा…“तुमच्या टांगा सांभाळा, तुमची जीभ चुरू चुरू चालतेय,” संजय राऊतांचा बावनकुळेंना इशारा
हेही वाचा…“..त्यामुळे मी राहुल गांधींचे मनापासून आभार मानतो,” नितीन गडकरींचं राहुल गांधीबाबत मोठं विधान
हेही वाचा…“शिवसेनाप्रमाणे काॅंग्रेसमध्येही तोच शिरस्ता,” राहुल गांधी आम्हाला वेळ देत नाही, काॅंग्रेसच्या नेत्यांची खंत
हेही वाचा…“जर मनात आणलं तर या क्षणाला ठाण्यातून…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
हेही वाचा…“जर मनात आणलं तर या क्षणाला ठाण्यातून…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल