मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस शब्द वापरल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावर आता खासदार संजय राऊतांनी खोचक टोला हाणला आहे.
हेही वाचा…शिंदेंचा एक आमदार बंडाच्या तयारीत, ठाकरे गटात प्रवेश करणार !
उद्धव ठाकरे आणखी बोलले तर त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. अशा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. त्यावर शिवसेनेला धमक्या देऊ नका. तुमच्या टांगा सांभाळा, तुमची जीभ चुरू चुरू चालतेय. ती फक्त इडी आणि सीबीआय असल्याने. पण सत्ता असेपर्यंतच बोलू शकाल. महाराष्ट्रात आणि दिल्लीतही तुमची सत्ता नसेल. तोपर्यंत यांच्यासारखे पोपट मिठू मिठू बोलतीय. तुमची जीभ चुरू चुरू चालतेय. असं संजय राऊतांनी म्हटलंय.
हेही वाचा…“संजय शिरसाठांना गल्लीतलं काळ कुत्रेसुद्धा…,” सुषमा अंधारेंची जहरी टिका
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांचं तिकीट २०१९ च्या निवडणुकीत का कापलं. यावरून संजय राऊत यांनी मोठा दावा केला. तुम्ही मोठा भ्रष्टाचार केला. दिल्लीपर्यंत प्रकरण गेलं होतं. त्यामुळे घराबाहेर पडू दिलं नाही. तुम्हाला आणि तुमच्या पत्नीलाही तिकीट दिलं नाही. तुम्ही त्यावर आधी खुलासा करा. तुम्ही काय लुट केली होती, वीज खात्यात हे आम्ही बोलायला गेलो तर तुमचं कठीण होईल. असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Read also
हेही वाचा…“..त्यामुळे मी राहुल गांधींचे मनापासून आभार मानतो,” नितीन गडकरींचं राहुल गांधीबाबत मोठं विधान
हेही वाचा…“शिवसेनाप्रमाणे काॅंग्रेसमध्येही तोच शिरस्ता,” राहुल गांधी आम्हाला वेळ देत नाही, काॅंग्रेसच्या नेत्यांची खंत
हेही वाचा…“जर मनात आणलं तर या क्षणाला ठाण्यातून…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
हेही वाचा…“जर मनात आणलं तर या क्षणाला ठाण्यातून…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
हेही वाचा…भाजप-शिंदे गटात फूट? शिंदे गटाच्या मंत्र्याची भाजपवर टीका..