नागपुर : देशातील एव्हाना राज्यातील राजकीय वातावरण काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यामुळे चांगलचं तापलं आहे. सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजपने आता राज्यात वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यास सुरूवात केली आहे. यातच काल नागपुर येथे वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करत सावरकर घराघरात पोहचल्याबद्दल त्यांनी राहुल गांधी यांचे आभारही मानले. या कार्यक्रमाला राज्यातील भाजपचे प्रमुख नेतेही उपस्थित होते.
हेही वाचा…“संजय शिरसाठांना गल्लीतलं काळ कुत्रेसुद्धा…,” सुषमा अंधारेंची जहरी टिका
राहुल गांधी यांनी मनाचा मोठेपणा दाखवून याबाबतीत त्यांनी भारतीय समाजाची क्षमा मागितली पाहिजे. इंदिरा गांधी, तसेच त्यांच्या आजोबांनी त्यांनी त्याबाबत काय म्हटलं होतं. सावकरकरांचा अपमान करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला ? हे पण करून त्यांनी स्वत:चं नुकसान केलं आहे. अन् निश्चितपणे सावरकरांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला त्यांचा केलेला अपमान कधीही सहन होणार नाही. असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं.
हेही वाचा…“मग त्या महापुरूषांबद्दल का गौरवयात्रा काढण्यात आल्या नाहीत ?” अजित पवारांचा भाजपला खोचक सवाल
आमचं राष्टभिमान ज्वाज्वल आहे. राष्ट्रवाद हा आमचा अपमान आहे. राजकारणामध्ये आम्ही लाल दिव्याची गाडी मिरवायला आम्ही आलेलो नाही. .यात काहीही झालं तरी आम्ही आमचा विचार बदलणार नाही. विचार आमचं दैवत असून हे विचार आम्हाला वीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेत. त्याविचाराची ठेव आमच्या मनात आहे. गांधींनी जो अपमान केला आहे. त्यामुळे सावरकर छोटे झाले नाहीत. परंतु आम्हाला एक संधी मिळाली की पुन्हा एकदा सावरकरांना घराघरात पोहचवून अन् सत्य लोकांपर्यंत सांगून, तरूण पीढीला सावरकर समजून सांगण्यासाठी संधी दिलीत. मी राहुल गांधी यांचे मनपासून आभार मानतो. असंही गडकरी म्हणाले.
#सावरकर_गौरव_यात्रा #नागपूर @nitin_gadkari.@cbawankule @Dev_Fadnavis @SMungantiwar @DoctorAnilBonde pic.twitter.com/Mqw1GxFqFC
— Pravin Alai (प्रविण अलई) (@PravinAlai) April 5, 2023
Read also
हेही वाचा…“शिवसेनाप्रमाणे काॅंग्रेसमध्येही तोच शिरस्ता,” राहुल गांधी आम्हाला वेळ देत नाही, काॅंग्रेसच्या नेत्यांची खंत
हेही वाचा…“जर मनात आणलं तर या क्षणाला ठाण्यातून…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
हेही वाचा…“जर मनात आणलं तर या क्षणाला ठाण्यातून…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
हेही वाचा…भाजप-शिंदे गटात फूट? शिंदे गटाच्या मंत्र्याची भाजपवर टीका..
हेही वाचा…शिंदेंचा एक आमदार बंडाच्या तयारीत, ठाकरे गटात प्रवेश करणार !