पुणे : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांना अप्रत्यक्षपणे घरी बसण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही अजित पवारांवर जोरदार टिका केली. यातच सध्या लोकसभा निवडणुकीची धुमाळी सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी एक व्हिडीओ शेअर करत अजित दादांवर टिका केलीय.
हेही वाचा…कॉंग्रेस लोकसभेच्या १८ जागा लढविणार ; महायुतीसमोर तगडे आव्हान, उमेदवारांची यादी जाहीर ?
रोहित पवारांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओत एक म्हातारा माणूस कुस्तीत एक तरूणाला चितपट करतांना दिसत आहे. याचाच संदर्भ देत वय नाही तर जिद्द महत्वाची असते. हेच व्हॉटसअपवर आलेल्या कुस्तीच्या व्हिडीओतून दिसतं. म्हणूनच वयाकडं बोट दाखवून तुम्ही थांबत का नाही ? असा प्रश्न विचारायचा नसतो. असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…अखेर माढा लोकसभा मतदासंघाचा तिढा सुटला ; रामराजे नाईक निंबाळकर यांचं एक पाऊल मागे
पुढे बोलतांना रोहित पवारांनी असं म्हटलंय की, पैलवान कधीच म्हातारा होत नसतो. राहिला प्रश्न भजनाचा, तर भजन हा व्यक्तिगत भक्तीचा विषय असल्याने कोणत्याही वयात भजन करता येतं. त्यामुळं भजनाला वयाशी जोडणं, हेही चुकीचं आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी कोवळ्या वयात भक्ती आणि अध्यात्माचा पाया रचला हे कळणंही महत्वाचं असतं आणि ते कळायला अध्यात्मावर भक्ती आणि आस्था लागते. असेही त्यात म्हटलंय.
वय नाही तर जिद्द महत्वाची असते, हेच व्हॉटसअपवर आलेल्या कुस्तीच्या या व्हिडिओतून दिसतं… म्हणूनच वयाकडं बोट दाखवून ‘तुम्ही थांबत का नाही?’ असा प्रश्न विचारायचा नसतो..
पैलवान कधीच म्हातारा होत नसतो..💪राहिला प्रश्न भजनाचा, तर भजन हा व्यक्तिगत भक्तीचा विषय असल्याने कोणत्याही वयात… pic.twitter.com/EmbVHhXyxL
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 21, 2024
READ ALSO :
हेही वाचा…रणजित सिंह निंबाळकरांच्या उमेदवारीवर भाजप ठाम ; नाराजींची नाराजी भाजप दुर कशी करणार ?
हेही वाचा…मनसेच्या महायुतीतील सहभागाची आजच घोषणा ; राज ठाकरेंना किती जागा? हालचालींना वेग
हेही वाचा…रामटेक अन् नागपुरमध्ये पहिल्याच दिवशी ११३ अर्जांची विक्री, ४०० पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचाअजित पवार गटातील ‘विलास लांडे’ अपक्ष लढणार, शिरूरमध्ये तिरंगी लढत अटळ ? राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…कसब्याची जादू पुण्यातही दिसणार ; पुण्यातून कॉंग्रेसचे धंगेकर लोकसभेसाठी निश्चित