मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडीओ सध्या मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत शीतल म्हात्रे यांनी आपला व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. तसंच दहिसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणाची एसआयटी चौकशी करणार असल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.
हेही वाचा…‘बाहेरचं पार्सल’ म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर जहरी टिका, कर्जतचं राजकारण तापणार ?
या प्रकरणाबाबत आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आले आहे. तर चार मोबाईल आणि चार सीमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यावरून ठाकरे गटाच्या नेत्यांकडून राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.
हेही वाचा..‘लाल वादळ’ विधानसभेवर धडकणार, शेतकरी प्रश्न, पेन्शनचा मुद्दा, मुंबईच्या दिशेने किसान सभेचा मोर्चा
दरम्यान सोमवारी सकाळी ते मुंबई विमानतळावर येताच दहिसर पोलिसांनी साईनाथ दुर्गे यांना ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीनुसार, मातोश्री या फेसबुक पेजवरून शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा रोड शोमधील एक व्हिडीओ मोर्फे करून व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर तपास केला असता रात्री कल्याणमधून विनायक डायरे या तरूणालाही ताब्यात घेतलं आहे.
Read also
- हेही वाचा…“दुध का दुध, पाणी का पाणी झालं पाहिजे,” शीतल म्हात्रेंच्या व्हिडीओवरून अजित पवार संतापले
- हेही वाचा..बच्चू कडूंना अटक करा, आसामच्या विधानसभेत मागणी, विरोधक आक्रमक, ‘ते’ वक्तव्य भोवलं
- हेही वाचा..वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्र्यांच्या विरूद्ध कडक कारवाई करण्याचे धाडस कराल का ?
- हेही वाचा…“जुन्या पेन्शनसंदर्भात सरकार तातडीने निर्णय घेणार नाही, २० लाख संपकरी संपाच्या वाटेवर”?
- हेही वाचा…राहुल कुल यांच्याविरोधात राष्ट्रवादी अन् काॅंग्रेस एकत्र, निलंबणाची मागणी, कर्ज थकवलं, काय काय आरोप केलेत?