मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडीओ सध्या मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत शीतल म्हात्रे यांनी आपला व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. तसंच दहिसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यावर आज सभागृहात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुद्दा मांडला.
हेही वाचा..‘लाल वादळ’ विधानसभेवर धडकणार, शेतकरी प्रश्न, पेन्शनचा मुद्दा, मुंबईच्या दिशेने किसान सभेचा मोर्चा
राजकीय क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करताना स्वत:चं चारित्र्य चांगलं ठेवणं खुप महत्त्वाचं असतं. कारण लोक आमच्याकडे ‘पब्लिक फिगर’ म्हणून पाहत असतात. त्यामुळे राजकीय मतं वेगवेगळी असू शकतात, मतमतांतरं असू शकतात. त्याबद्दल मला खोलात जायचं नाही. मात्र कुठल्याही लोकप्रतिनिधीने काही केलं नसताना कुणी जाणीवपुर्वक असे प्रकार केले, त्यामागे कुणी मास्टरमाईंड असेल, तर आमचं स्पष्ट मत आहे की, याची चौकशी झाली पाहिजे, दुध का दुध, पाणी का पाणी झालं पाहिजे, वस्तूस्थिती काय आहे हे लोकांना आणि सभागृहाला कळली पाहिजे. असंही ते म्हणाले.
हेही वाचा..“इडीच्या चौकशीला हजर राहणार नाही पण..”, ईडीची नोटीस आल्यानंतर मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, याप्रकरणात दहिसर पोलिसांनी कल्याणच्या तिसगाव परिसरातून विनायक डायरे या तरूणाला ताब्यात घेतले आहे. विनायक डायरे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोशल मीडिया सेल कार्यकर्ता आहे. परंतु यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप डायरेंच्या कुटुंबीयांनी केला.
Read also
- हेही वाचा..बच्चू कडूंना अटक करा, आसामच्या विधानसभेत मागणी, विरोधक आक्रमक, ‘ते’ वक्तव्य भोवलं
- हेही वाचा..वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्र्यांच्या विरूद्ध कडक कारवाई करण्याचे धाडस कराल का ?
- हेही वाचा…“जुन्या पेन्शनसंदर्भात सरकार तातडीने निर्णय घेणार नाही, २० लाख संपकरी संपाच्या वाटेवर”?
- हेही वाचा…राहुल कुल यांच्याविरोधात राष्ट्रवादी अन् काॅंग्रेस एकत्र, निलंबणाची मागणी, कर्ज थकवलं, काय काय आरोप केलेत?
- हेही वाचा…‘बाहेरचं पार्सल’ म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर जहरी टिका, कर्जतचं राजकारण तापणार ?