कोल्हापुर : कागल मधील राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर अलिकडेच ईडीची धाड पडली. तब्बल ९ तास चौकशी केल्यानंतर इडीचे अधिकारी हसन मुश्रीफांच्या घरातून बाहेर पडले. ईडीचे अधिकारी ज्यावेळी घरात आले. तेव्हा हसन मुश्रीफ त्यांच्या घरी उपस्थित नव्हते. त्यांनतर त्यांना इडीची नोटीस पाठवण्यात आली. त्यावर आता हसन मुश्रीफ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हेही वाचा…“कसब्याचा पराभव अजूनही भाजपच्या मनी घुमतोय, मुंबईत पुण्यातील भाजपचे नेत्यांची मंथन बैठक”
हसन मुश्रीफ म्हणाले की, इडीचे काही अधिकारी माझ्या निवासस्थानी येऊन गेले, त्या दिवशी मी हजर नव्हतो. दोन दिवस मी बाहेर होतो. पण माझ्या कुटुंबीयांची अवस्था मी टीव्हीवर पाहिली. ते पाहून मी माझ्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी घरी आलो आहे. तसेच पुढे म्हणाले की, पहिल्या केसमध्ये माझं नावच नव्हतं. ज्या गोष्टीशी माझा संबंध नाही. त्याप्रकरणी मला समन्स बजावण्यात आलाय. या प्रकरणाशी माझा काहीच संबंध नाही. पण इडीला उत्तर देताना मी तसं सांगणार आहे. त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करू असंही मुश्रीफ यांनी आश्वासन दिलं.
हेही वाचा…“मुलुंडच्या पोपटाला वेड्याच्या इस्पितळात दाखल करा, लवकरच जनता ठोकून काढेल “, राष्ट्रवादीचा सोमय्यांना टोला
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, सध्या विधानसभा अधिवेशन सुरू आहे. जवळपास चार लाख लोकांनी माझ्यावर आमदार म्हणून जबाबदारी टाकलेली आहे. त्याशिवाय जिल्हाय मध्यवर्ती बॅंकेचा मी चेअरमन आहे. इतरही काही संस्थांची माझ्यावर जबाबदारी आहे. त्यात ३१ मार्च येतोय. त्यामुळे बॅंकेची अनेक महत्वाची कामे पार पाडावी लागतात. हे सर्व पाहता महिन्याभराची मुदतवाढ मिळावी, यासाठी वकिलाच्या माध्यमातून विनंती करणार आहे.
Read also
- हेही वाचा…“अब्दुल गद्दार, स्वारी अब्दुल सत्तार, ” वादग्रस्त वक्तव्यानंतर आदित्य ठाकरेंची सत्तारांवर बोचरी टिका
- हेही वाचा…कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, तर सभागृहात विरोधक आक्रमक
- हेही वाचा…राऊतांचा ५०० कोटींचा आरोप, राहुल कुलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “त्यांना अजूनही..”
- हेही वाचा..“राऊतांनी राजकीय बॉम्ब फोडला, पुराव्यासह भाजपच्या आमदारावर ५०० कोटीचा आरोप, चौकशी करण्याची मागणी
- हेही वाचा..“संजय राऊत यांनी एकदा मोकळा होऊन महाराष्ट्रात फिरून दाखवावं”