मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण मागील काही दिवसापासून चांगलचं चर्चेत आलं आहे. अलिकडेच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीची धाड पडली. तर साई रिसोर्ट प्रकरणी माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या एका बड्या नेत्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत पुराव्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा..आघाडीने मंजूरी दिली, पण फडणवीसांचे मानले आभार..! रोहित पवारांच्या ‘त्या’ कृतीची सर्वत्र चर्चा
संजय राऊत यांनी यांसदर्भात देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवलं आहे. त्यात त्यांनी भाजपचे नेते आणि आमदार राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींचा भ्रष्ट्रचाराचा आरोप केला आहे. पुणे जिल्ह्यातील तालुका दौंड येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखाना लि. मध्ये ५०० कोटीचा भ्रष्ट्रचार झाल्याचं संजय राऊतांनी पत्रात म्हटलं आहे. याप्रकरणी त्यांनी इडी व सीबीआय मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच भ्रष्टचारास धर्म व राजकीय पक्ष नसतो. त्यामुळे भ्रष्टाचाराची वाळवी नष्ट होणे गरजेचे आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! साई रिसोर्ट गैरव्यवहार प्रकरणी सदानंद कदमांना १५ मार्चपर्यंत इडीची कोठडी
दरम्यान, विधीमंडळाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी संजय राऊतांवर हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. यासाठी समितीही नेमली असून या समितीचे अध्यक्षपद राहुल कुल यांच्याकडे आहेत. त्यामुळे सध्या सत्ताधारी आणि विरोधकांच्या या प्रकराबाबत लोकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे. यातच भाजपचे नेते किरीट सोमय्यांचाही उल्लेख त्यात करण्यात आला आहे.
To Shri @KiritSomaiya ji@NirajGunde @nsitharaman @iambadasdanve @NANA_PATOLE @anjali_damania @rahulnarwekar
@BJP4India@@BJP4Maharashtra pic.twitter.com/7KYTTTueVG— Sanjay Raut (@rautsanjay61) March 13, 2023
प्रिय देवेंद्र जी
आपल्या माहितीसाठी भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ पाठवीत आहे..
Pmla कायद्याने कारवाई व्हावी असे घोटाळे संचालक मंडळाने केलें आहेत व राजकीय वरदहस्त लाभला असल्याने ते बिनधास्त आहेत.
शेतकऱ्यांच्या फसवणकीस सरकारी पाठींबा आहे का?कारवाई करा!@Dev_Fadnavis pic.twitter.com/AeiV3gjxaJ
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 13, 2023
Read also
- हेही वाचा..“संजय राऊत यांनी एकदा मोकळा होऊन महाराष्ट्रात फिरून दाखवावं”
- हेही वाचा…“कसब्याचा पराभव अजूनही भाजपच्या मनी घुमतोय, मुंबईत पुण्यातील भाजपचे नेत्यांची मंथन बैठक”
- हेही वाचा…“मुलुंडच्या पोपटाला वेड्याच्या इस्पितळात दाखल करा, लवकरच जनता ठोकून काढेल “, राष्ट्रवादीचा सोमय्यांना टोला
- हेही वाचा…मुश्रीफांच्या घरावर ईडीची धाड, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, की… माहिती..
- हेही वाचा..“साडे नऊ तास इडीची चौकशी, हसन मुश्रीफांच्या घरातून इडीचे अधिकारी काय घेऊन गेले?”