बुलढाणा : सध्या राज्यात ठाकरे आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर टिका टिप्पणी करण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाही. यातच रोज पत्रकार परिषदमधून संजय राऊत शिवसेना आमदारांवर टिकास्त्र सोडत आहेत. यातच लफग्यांना 2024 ला लोक रस्त्यावर पळवून पळवून हाणतील असा टोला राऊतांनी शिवसेनेच्या आमदारांवर लगावला आहे. त्यावर आता शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी देखील संजय राऊतांवर जोरदार टिका केली.
हेही वाचा…मोठी बातमी..! साई रिसोर्ट गैरव्यवहार प्रकरणी सदानंद कदमांना १५ मार्चपर्यंत इडीची कोठडी
लोक आम्हाला मारणार नाहीत तर संजय राऊत यांना धडा शिकवतील. संजय राऊत याने एकदा मोकळा होऊन महाराष्ट्रात फिरून दाखवावं. अक्कलकोटला बोलावून लोक दर्शनाला मारणार आहेत. असा टोलाही संजय शिरसाठ यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
हेही वाचा…“उद्योजकांनी पुढे येऊन आपला स्टॅंड घ्यायला हवा,” इम्तियाज जलील यांचं आवाहन
कसब्यातील निकालानंतर महाविकास आघाडी ज्या गतीने पुढे जात आहे. त्याला खिळ घालण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्यामुळे सध्या राज्यात इडीच्या कारवाया केल्या जात आहेत. जे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करीत आहेत. ते सर्व लफंगे आहेत. अन् २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ह्या लफंग्यांना जनता रस्त्यावर पळवून पळवून हाणतील. असा इशारा खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांना दिला आहे.
हेही वाचा..““राऊतांनी सुरक्षा सोडून बाहेर यावं मग…”राऊतांनी डिवचलं, गायकवाडांचा पलटवार
त्यावर संजय गायकवाड यांनी पलटवार केला. संजय राऊतांना आम्ही काही महत्व देत नाहीत. कुठल्याही आमदार, खासदारांना मारण्यासाठी महाराष्ट्रात कोणीही पयदा झाला नाही. ज्यांचा हात आमच्या अंगावर पडेल. त्याचा हात तोडण्याची हिमंत आम्ही ठेवली आहे. त्यामुळे भडोत्री लोकांच्या भरवशावर संजय राऊतांनी भाषा वापरू नये. तसेच त्यांनी सुरक्षा सोडून बाहेर यावं. मग लफंगे काय असतात. ते आम्ही दाखवू. असा इशाराही संजय गायकवाड यांनी दिला.
Read also
- हेही वाचा…“कसब्याचा पराभव अजूनही भाजपच्या मनी घुमतोय, मुंबईत पुण्यातील भाजपचे नेत्यांची मंथन बैठक”
- हेही वाचा…“मुलुंडच्या पोपटाला वेड्याच्या इस्पितळात दाखल करा, लवकरच जनता ठोकून काढेल “, राष्ट्रवादीचा सोमय्यांना टोला
- हेही वाचा…मुश्रीफांच्या घरावर ईडीची धाड, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, की… माहिती..
- हेही वाचा..“साडे नऊ तास इडीची चौकशी, हसन मुश्रीफांच्या घरातून इडीचे अधिकारी काय घेऊन गेले?”
- हेही वाचा..आघाडीने मंजूरी दिली, पण फडणवीसांचे मानले आभार..! रोहित पवारांच्या ‘त्या’ कृतीची सर्वत्र चर्चा