पुणे : अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ अडचणीत सापडले आहेत. आज सकाळीच इडीच्या अधिकाऱ्यांनी मुश्रीफांच्या घरावर धाड टाकली. जवळपास साडे नऊ तास तपास केल्यानंतर इडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरातून बाहेर पडले. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा..“काॅंग्रेसचे नेते काॅंग्रेसच्याच विरोधात निवडणुक आयोगाकडे जाणार”, काॅंग्रेस पक्षात मोठे बदल
सकाळीच इडीचे अधिकारी हसन मुश्रीफांच्या घरी आल्याने मोठ्या संख्येने कार्यकर्ते घरासमोर जमा झालेत. त्यानंतर कार्यकर्त्यांनी ईडी आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. तर कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोरच ठिय्या आंदोलन केलं. त्यावर मला देखील ही बातमी आताच कळली आहे. त्यामुळे माहिती घेऊन यावर प्रतिक्रिया देणं उचित ठरेल. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“सनातन धर्म म्हणजे वर्ण व्यवस्था, लगेच प्रत्येय आला” आव्हाडांचा भाजपवर निशाणा
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईने संतप्त झालेल्या एका मुश्रीफ समर्थकाने सीआरपीएफ जवानांच्या समोर जमिनीवर डोके आपटून घेतल्याने तो जखमी झाला. सागर दावणे असे त्याचे नाव आहे. जखमीच उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मुश्रीफांच्या निवासस्थानासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला आहे.
Read also
- हेही वाचा..“साडे नऊ तास इडीची चौकशी, हसन मुश्रीफांच्या घरातून इडीचे अधिकारी काय घेऊन गेले?”
- हेही वाचा..आघाडीने मंजूरी दिली, पण फडणवीसांचे मानले आभार..! रोहित पवारांच्या ‘त्या’ कृतीची सर्वत्र चर्चा
- हेही वाचा…मोठी बातमी..! साई रिसोर्ट गैरव्यवहार प्रकरणी सदानंद कदमांना १५ मार्चपर्यंत इडीची कोठडी
- हेही वाचा…“उद्योजकांनी पुढे येऊन आपला स्टॅंड घ्यायला हवा,” इम्तियाज जलील यांचं आवाहन
- हेही वाचा..““राऊतांनी सुरक्षा सोडून बाहेर यावं मग…”राऊतांनी डिवचलं, गायकवाडांचा पलटवार