अहमदनगर : कर्जत-जामखेडमधील पोलिस निवासस्थांनांचं लोकापर्ण केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आभार मानले आहेत. लोकार्पण सोहळ्याच्या अगोदरच आभाराचे बॅनर कर्जत जामखेड मध्ये बघायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा…साहेबांवरचं प्रेम..! मुश्रीफांवर ईडीची धाड, कार्यकर्त्यानी डोकं आपटून घेतलं
रोहित पवार यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंजूर केलेल्या आणि बांधून पुर्ण झालेल्या कर्जत- जामखेडमधील पोलीस निवासस्थांनांचं लोकार्पण केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आपले मनापासून आभार..! अस रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“नो पेन्शन नो वोट’ चा भाजपला धसका, जुनी पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक
तसेच पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, यामुळे पोलिसांना तिथे प्रत्यक्ष राहता येणार असल्याने त्यांची गैरसोय होणार नाही, परिणामी त्यांना लोकांनाही चांगली सेवा देता येणार नाही. याशिवाय महाविकास आघाडी सरकारने खर्डा आणि मिरजगाव हे दोन पोलीस ठाणे निर्माण केले असून तिथे पुरेसे मनुष्यबळ दिल्याने त्यांचं कामकाजही सुरू झालं आहे. मात्र हा पोलीस ठाण्यांची इमारत आणि पोलिस निवासस्थानांसाठी माझा पाठपुरावा अंतिम टप्प्यात आहे. त्यालाही आपण सहकार्य करावं. तसंच मतदारसंघात रस्त्यांसह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी असलेल्या चौंडी येथील विकास कामांसह इतरही धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रांच्या ठिकाणच्या मंजूर झालेल्या कामांना विद्यमान सरकारने दिलेली स्थगिती उठवावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.
काल अर्थसंकल्पीय भाषणामध्ये महापुरुषांच्या जन्मस्थळाबद्दल बोलताना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ चौंडीचा उल्लेख मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राहिला होता, तो उल्लेख महापुरुषांच्या जन्मभूमीच्या विकासाच्या बाबतीत उत्तर देताना करून माझ्या मतदारसंघात… https://t.co/ETbeiOX7DJ pic.twitter.com/6cIO5BqPuF
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 10, 2023
Read also
- हेही वाचा…मोठी बातमी..! साई रिसोर्ट गैरव्यवहार प्रकरणी सदानंद कदमांना १५ मार्चपर्यंत इडीची कोठडी
- हेही वाचा…“उद्योजकांनी पुढे येऊन आपला स्टॅंड घ्यायला हवा,” इम्तियाज जलील यांचं आवाहन
- हेही वाचा..““राऊतांनी सुरक्षा सोडून बाहेर यावं मग…”राऊतांनी डिवचलं, गायकवाडांचा पलटवार
- हेही वाचा..“काॅंग्रेसचे नेते काॅंग्रेसच्याच विरोधात निवडणुक आयोगाकडे जाणार”, काॅंग्रेस पक्षात मोठे बदल
- हेही वाचा..“सनातन धर्म म्हणजे वर्ण व्यवस्था, लगेच प्रत्येय आला” आव्हाडांचा भाजपवर निशाणा