नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात विरोधी पक्ष मोर्चेबांधणी करतांना दिसत आहे. येत्या वर्षात म्हणजे 2024 ला लोकसभेची निवडणुक होत आहे. भाजप सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. तर दुसऱ्या बाजूला काॅंग्रेस देखील प्रयत्न करीत आहेत. मात्र यातच काॅंग्रेसचे सर्व अधिकार अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे गेल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा..“कांद्याचे भाव वाढले म्हणून दंगा करणारे लोक आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत”
काॅंग्रेस पक्षात मोठे बदल करण्यात आले आहेत. काॅंग्रेसचे सर्व अधिकार आता काॅंग्रेस अध्यक्ष मलिल्कार्जून खरगे यांच्याकडे देण्यात आले आहे. काॅंग्रेसमधील या बदलामुळे अनेकांमध्ये नाराजी आहे. पक्षातील अतंर्गत विरोधही आता चव्हाट्यावर आला आहे. खरगे यांच्या अधिकार दिले गेले हे काॅंग्रेसच्या संविधानाच्या बाहेर आहे, असं या नेत्यांचं म्हणणं आहे. हाच मुद्दा घेऊन आता हे नेते केंद्रीय निवडणुक आयोगाकडे जाणार आहेत. हे काॅंग्रेस संविधान विरोधी असल्याने यावर निर्बंध आणले जावेत, अशी मागणी या नेत्यांची आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! “राष्ट्रवादीच्या विधान परिषद गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती”
दरम्यान, अलिकडेच नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काॅंग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला होता. अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आणि काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वाद बाहेर आला होता. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या.
Read also
- हेही वाचा..“सनातन धर्म म्हणजे वर्ण व्यवस्था, लगेच प्रत्येय आला” आव्हाडांचा भाजपवर निशाणा
- हेही वाचा…साहेबांवरचं प्रेम..! मुश्रीफांवर ईडीची धाड, कार्यकर्त्यानी डोकं आपटून घेतलं
- हेही वाचा…“नो पेन्शन नो वोट’ चा भाजपला धसका, जुनी पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक
- हेही वाचा..“शरद पवारांनी आयुष्यभर राजकीय स्वार्थासाठी जातीपातीत भांडण लावली”, भाजपची जहरी टिका
- हेही वाचा..सकाळी मुश्रीफांनी,आता अनिल परबांनी सोमय्यांना अडचणीत पकडलं, थेट हक्कभंगाचा प्रस्ताव