मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफांवर केलेल्या आरोपांवर कोर्टोने किरीट सोमय्यांना चांगलचं फटकारलं. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांनी देखील सोमय्यांना अडचणीत पकडलं आहे. त्यामुळे आता पुढे काय राजकीय घडामोडी घडणार ? त्याकडे आता सगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा..“बच्चू कडूंची गद्दारी पक्षासोबत होऊ शकते, सर्व सामान्यांशी नाही”
म्हाडाच्या प्रकरणात किरीट सोमय्यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. परंतु म्हाडाने हे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यानंतर आज विधीमंडळात अनिल परब यांनी म्हाडाच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. त्यामुळे या प्रकरणाची आता पुढील चौकशीत काय बाहेर येणार? ते पाहणं महत्वाच ठरणार आहे.
हेही वाचा…नाना पटोलेंना काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवणार? काय म्हणाले शिवाजीराव मोघे ?
सभागृहात अनिल परब म्हणाले की, महाराष्ट्र विधान परिषद नियम २४१ अन्वये मी विशेष हक्कभंगाची सूचना देतोय. मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकस मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद भूरीकर आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात हक्कभंगाची सुचना देत आहे. संबंधित प्रकरण आपण पुढील चौकशी आणि कारवाईसाठी विशेष हक्क समितीकडे पाठवावे, अशी विनंती करतो.
हेही वाचा…“राज्यात १४ मार्चला मोठा राजकीय भुंकप”, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा
“महाराष्ट्र विधान परिषद नियम 241 अन्वये मी विशेष हक्कभंगाची सूचना देतोय. मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद भूरीकर आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना देत आहे. संबंधित प्रकरण आपण पुढील चौकशी आणि कारवाईसाठी विशेष हक्क समितीकडे पाठवावे, अशी विनंती करतो”, असं अनिल परब विधान परिषदेत म्हणाले.
Read also
- हेही वाचा..“कांद्याचे भाव वाढले म्हणून दंगा करणारे लोक आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत”
- हेही वाचा…मोठी बातमी…! “राष्ट्रवादीच्या विधान परिषद गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती”
- हेही वाचा…“खेडच्या विराट सभेतील ‘उद्धव’ दर्शनानंतर भाजपने हिंस्र नखं बाहेर काढली”
- हेही वाचा..सोमय्यांना जोर चा झटका, फासे पलटले, मुश्रीफांवरील आरोप भोवले, चौकशीचे दिले आदेश
- हेही वाचा..“शरद पवारांनी महाविकास आघाडीकडून बाहेर पडावं,” रामदास आठवले