कोल्हापुर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी आज सकाळीच ईडीने धाड टाकली आहे. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी ही गेल्या २ महिन्यातील तिसरी धाड टाकली आहे. ईडीचे ४ ते ५ अधिकारी सकाळीच हसन मुश्रीफ यांच्या घरी आल्याने कार्यकर्त्यांनी मुश्रीफांच्या घरासमोर मोठी गर्दी करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी दिली. तर जवळपास साडे नऊ तास चौकशी केल्यानंतर इडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरातून बाहेर पडले आहेत.
हेही वाचा..“सनातन धर्म म्हणजे वर्ण व्यवस्था, लगेच प्रत्येय आला” आव्हाडांचा भाजपवर निशाणा
आज सकाळीच इडीचे अधिकारी हसन मुश्रीफ यांच्या घरी पोहचले होते. त्यानंतर त्यांनी मुश्रीफांच्या घरात जाऊन चौकशी सुरू केली. ही बातमी कार्यकर्त्यांना समजाच मुश्रीफांच्या घरासमोर हजारो कार्यकर्ते जमा झालेत. अन् त्यांनी तिथेच ठिय्या दिला. यातच साडे नऊ तासानंतर अधिकारी बाहेर पडल्यानंतर कार्यकर्ते गेलेत. त्यामुळे आता या चौकशीत काय माहिती बाहेर येणार ? ते पाहणं महत्वाचं आहे.
हेही वाचा…साहेबांवरचं प्रेम..! मुश्रीफांवर ईडीची धाड, कार्यकर्त्यानी डोकं आपटून घेतलं
यातच जोगेश्वरीत अनधिकृत फाईव्ह स्टार हॉटेल बांधल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणामध्ये किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्याविरोधात ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात रवींद्र वायकर यांनी ५०० कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. आलिबाग कोर्ले १९ बंगल्यतील उद्धव ठाकरे यांचे पार्टनर रवींद्र वायकर असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा..आघाडीने मंजूरी दिली, पण फडणवीसांचे मानले आभार..! रोहित पवारांच्या ‘त्या’ कृतीची सर्वत्र चर्चा
- हेही वाचा…मोठी बातमी..! साई रिसोर्ट गैरव्यवहार प्रकरणी सदानंद कदमांना १५ मार्चपर्यंत इडीची कोठडी
- हेही वाचा…“उद्योजकांनी पुढे येऊन आपला स्टॅंड घ्यायला हवा,” इम्तियाज जलील यांचं आवाहन
- हेही वाचा..““राऊतांनी सुरक्षा सोडून बाहेर यावं मग…”राऊतांनी डिवचलं, गायकवाडांचा पलटवार
- हेही वाचा..“काॅंग्रेसचे नेते काॅंग्रेसच्याच विरोधात निवडणुक आयोगाकडे जाणार”, काॅंग्रेस पक्षात मोठे बदल