मुंबई : राज्यातील सध्याचं राजकीय वातावरण चांगलचं ढवळून निघालं आहे. आज सकाळीच इडीच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी पोहचले. तर शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना इडीने १५ मार्चपर्यंत इडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. त्याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा..““राऊतांनी सुरक्षा सोडून बाहेर यावं मग…”राऊतांनी डिवचलं, गायकवाडांचा पलटवार
हसन मुश्रीफ यांना इडीकडून अटक होणार असल्याचा एफआयआर सर्वात प्रथम किरीट सोमय्या यांना कसा मिळाला. ? असा सवाल करीत कोर्टोन सोमय्यांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. तर सोमय्यांनी अनिल परब यांच्यावरही टिका केली. त्यानंतर मुलुंडच्या पोपटाला वेड्याच्या इस्पितळात दाखल करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात आज महाराष्ट्राबाहेरील पोपटांचा बोलबाला सुरु आहे. पद्धतशीरपणे भाजपने एकेक प्याद्याला बाहेर काढायला सुरूवात केली आहे. लवकरच जनता यांना ठोकून काढेल. असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा..“काॅंग्रेसचे नेते काॅंग्रेसच्याच विरोधात निवडणुक आयोगाकडे जाणार”, काॅंग्रेस पक्षात मोठे बदल
दरम्यान, सदानंद कदम यांना काल अटक केली. त्या अटकेआधी आमचे मुलंडचे पोपटलाल बोलत होते. सदानंद कदम यांना अटक करण्याचं कारण काय? एका तथाकथित प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. परंतु त्याआधी खेडची सभा यशस्वी करण्यामागे सदानंद कदम यांचा मोठा हात होता. एका कारणामागे त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांना अटक केल्याची बातमी इडीने देण्याआधी मुलंडच्या पोपटलालने दिली. याचा अर्थ काय? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
मुलुंडच्या पोपटाला वेड्याच्या इस्पितळात दाखल करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात आज महाराष्ट्राबाहेरील पोपटांचा बोलबाला सुरू आहे. पद्धतशीरपणे भाजपने एकेक प्याद्याला बाहेर काढायला सुरुवात केली आहे. लवकरच जनता यांना ठोकून काढेल.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 11, 2023
Read also
- मुश्रीफांच्या घरावर ईडीची धाड, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, की… माहिती..
- हेही वाचा..“साडे नऊ तास इडीची चौकशी, हसन मुश्रीफांच्या घरातून इडीचे अधिकारी काय घेऊन गेले?”
- हेही वाचा..आघाडीने मंजूरी दिली, पण फडणवीसांचे मानले आभार..! रोहित पवारांच्या ‘त्या’ कृतीची सर्वत्र चर्चा
- हेही वाचा…मोठी बातमी..! साई रिसोर्ट गैरव्यवहार प्रकरणी सदानंद कदमांना १५ मार्चपर्यंत इडीची कोठडी
- हेही वाचा…“उद्योजकांनी पुढे येऊन आपला स्टॅंड घ्यायला हवा,” इम्तियाज जलील यांचं आवाहन