पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीकरीता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी पुण्यात तळ ठोकून बसल्यानंतरही भाजपला पराभावाचा सामाना करावा लागला. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा जवळपास ११ हजार मतांनी धुव्वा उडवला होता. भाजपचा २८ वर्षाचा बालेकिल्ला महाविकास आघाडीने उद्धवस्त केल्यानंतर भाजपने याचा मोठा धसका घेतला आहे.
हेही वाचा…“उद्योजकांनी पुढे येऊन आपला स्टॅंड घ्यायला हवा,” इम्तियाज जलील यांचं आवाहन
यातच कसबा पेठ विधानसभा निवडणुकीतील पराभवावर भाजप नेत्यांनी सबुरीचा पवित्रा घेतला आहे. कारवाईचा बगडा न उगारता पदाधिकाऱ्यांनी खचून न जाता झालेल्या चुका सुधारून पुन्हा कामाला लागावे, अशा सुचना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा..““राऊतांनी सुरक्षा सोडून बाहेर यावं मग…”राऊतांनी डिवचलं, गायकवाडांचा पलटवार
मुंबई भाजप पक्ष कार्यालयात बुधवारी रात्री कसबा पेठ विधानसभा निवडणुकीच्या निकालावर मंथन बैठक झाली. बावनकुळे व चंद्रकांत पाटील यांच्यासह या बैठकीला उमेदवार हेमंत रासने, प्रदेश सरचिटणीस मुरलधीर मोहोळ, आमदार माधूरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, शहाराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी सभागृह गणेश बिडकर, धीरज घाटे हे उपस्थित होते. या बैठकीत बावनकुळे आणि पाटील यांनी निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा जाणून घेतली.
हेही वाचा..“काॅंग्रेसचे नेते काॅंग्रेसच्याच विरोधात निवडणुक आयोगाकडे जाणार”, काॅंग्रेस पक्षात मोठे बदल
कुठल्याही निवडणुकीच्या पराभवानंतर त्याचा आम्ही आत्मचिंतन केला आहे. त्याचा आम्ही पोस्टमाटम करतोच. त्यानंतर पुढच्या निवडणुकीत त्याची काळजी आम्ही घेणार आहे. असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा…“मुलुंडच्या पोपटाला वेड्याच्या इस्पितळात दाखल करा, लवकरच जनता ठोकून काढेल “, राष्ट्रवादीचा सोमय्यांना टोला
- हेही वाचा…मुश्रीफांच्या घरावर ईडीची धाड, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, की… माहिती..
- हेही वाचा..“साडे नऊ तास इडीची चौकशी, हसन मुश्रीफांच्या घरातून इडीचे अधिकारी काय घेऊन गेले?”
- हेही वाचा..आघाडीने मंजूरी दिली, पण फडणवीसांचे मानले आभार..! रोहित पवारांच्या ‘त्या’ कृतीची सर्वत्र चर्चा
- हेही वाचा…मोठी बातमी..! साई रिसोर्ट गैरव्यवहार प्रकरणी सदानंद कदमांना १५ मार्चपर्यंत इडीची कोठडी