सिंधुदुर्ग : आज शिवसेनेचा ५५ वा वर्धानपनदिन आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर विविध उपक्रम शिवसेनेकडून आणि शिवसनेच्या विविध संघटनांकडून आयोजित केले गेले आहेत. असाच एक उपक्रम, सिंधुदुर्गातील एका पेट्रोल पंपावर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी, भाजपला डिवचण्यासाठी सुरु केला. त्यांनी या पेट्रोल पंपावर स्वस्तात पेट्रोल वाटप सुरु केले. मात्र, हा पेट्रोलपंप नेमका नारायण राणे यांच्या मालकीचा निघाला आणि नारायण राणेंची मालकी असलेल्या या पेट्रोल पंपावर, शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी सकाळी तुफान राडा झाला आहे.
हे पण वाचा, फटके देणारी शिवसेना राहिली नाही, आताची शिवसेना बिनशिंगाची – नारायण राणे
दरम्यान, यानंतर निलेश राणे यांनी लगेच ट्विट करत शिवसेनेची लायकी काढली असून, “शिवसेना पक्ष इतका भिकारी झाला आहे की त्यांच्या आमदाराला दुसऱ्यांच्या पेट्रोल पंपावर फुकट पेट्रोल भरून शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा करायचा आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक भिकाऱ्यासारखा पंपा बाहेर उभा होता तेव्हा त्याला तिथून हाकलून दिलं. ही लायकी आजच्या शिवसेनेची आहे,” असा घणाघात त्यांनी केला आहे.
शिव प्रसाद काय असतो ..
ते संजय राऊतांनी..आमदार वैभव नाईकना विचारावा..
पोटभर दिला आज आमच्या कार्यकर्त्यांनी..
पाहिजे असेल तर पार्सल घेऊन येतो सामना ऑफिस मधे ..
टेस्ट आवडेल नक्की!! @rautsanjay61— nitesh rane (@NiteshNRane) June 19, 2021
यानंतर आता नितेश राणे यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली असून, “शिव प्रसाद काय असतो .. ते संजय राऊतांनी..आमदार वैभव नाईकना विचारावा.. पोटभर दिला आज आमच्या कार्यकर्त्यांनी.. पाहिजे असेल तर पार्सल घेऊन येतो सामना ऑफिस मधे .. टेस्ट आवडेल नक्की!”, अशी जोरदार टीका त्यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर केली आहे.
हे पण वाचा, “अजित पवारांकडे १० सेकंद थांबून विचारपूस करायला देखील माणुसकी शिल्लक नाही”
आज सकाळी, वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल खरेदी करण्यासाठी पैसे वाटत होते. याचवेळी, भाजप कार्यकर्ते त्याठिकाणी आले आणि त्यांनी याला आक्षेप घेतला. यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणबाजी सुरु केली आणि त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. यावेळी आमदार वैभव नाईक यांनीही या हाणामारीत भाग घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यात पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि यानंतर वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते दुसऱ्या पेट्रोल पंपावर निघून गेले.
Read Also :
- राणे पिता-पुत्रांना बाळासाहेबांनी मोठे केले; काहीही बोलू नका आणि उपकार विसरू नका
- भाजप-शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरूच, निलेश राणेंनी काढली शिवसेनेची लायकी, म्हणाले…
- ‘आंदोलन करायला भाजप आजही घाबरली नाही आणि उद्याही घाबरणार नाही’
- शाब्बास रे वाघानो! शिवसैनिकांना भिडणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा नितेश राणेंकडून सत्कार
- ‘गतवर्षी केलेल्या ‘करेक्ट’ कार्यक्रमाची होणार याही वर्षी होणार पुनरावृत्ती’