मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयावर मागील काही काळात एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने मिळून कारवाई केली होती. या कारवाईमध्ये नंतर काही निष्पन्न न झाल्याने नवाब मलिक हे समीर वानखेडेंच्या विरोधात एकामागून एक पुरावे गोळावे करत होते.
संजय राऊतांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्ही जमिनीवर बसू; प्रविण दरेकरांचा आक्रमक पवित्रा
यामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. नवाब मलिक यांनी वानखेडेंच्या संपूर्ण कुटुंबाची पत्रिका काढत त्याच्यावर विविध आरोप केले आणि त्यांना न्यायालयात खेचलं. आता कोर्टाने आदेश दिल्यामुळे मलिक-वानखेडे संघर्ष काहीसा थांबला आहे. मात्र आता समीर वानखेडे आणि त्यांच्या पत्नी क्रांती रेडेकर यांनी पुन्हा एकदा न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
संजय राऊतांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्ही जमिनीवर बसू; प्रविण दरेकरांचा आक्रमक पवित्रा
यावेळी वानखडे कुटुंबीयांनी सोशल मिडियावर त्यांच्या आणि कुटुंबियांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर लगाम लावण्याच्या हेतुने सोशल मिडीया कंपन्यांना कोर्टात खेचले आहे. दिंडोशी कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. वानखेडे यांच्यावतीने ऍड. रोहन जनार्दन हे खटला लढवणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून वानखेडे कुटुंबियांवर खालच्या भाषेत भाष्य करणे किंवा बदनामी करणाऱ्यांच्या पोस्ट विविध सोशल प्लॅटफॉर्मनी थांबवाव्यात किंवा त्या कायमच्या काढून टाकाव्यात असा आदेश न्यायालायने द्यावा, अशी विनंती वानखेडे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात दोन सुनावण्या झालेल्या आहेत.
भाजपचा कुठलाही नेता, कोणत्याही महिलांबाबत अभद्र शब्द वापरू शकत नाही – देवेंद्र फडणवीस
न्यायालयाने मात्र या प्रकरणात अद्याप कोणतेही आदेश दिलेले नाहीत. या प्रकरणाची पुढील सुनावनी १७ डिसेंबर रोजी होणार आहे. मागच्या काही दिवसांपासून उच्च न्यायालयाच्या आदेशाने नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावरील हल्लाबोल थांबवला आहे. मात्र त्यापुर्वी त्यांनी अनेक पत्रकार परिषद घेवून समीर वानखेडे यांच्यावर बनावट जातीचे प्रमाणपत्र बाळगल्याचे आरोप केले होते.
Read Also :
- ३७८ दिवसांच्या अविरत संघर्षानंतर अखेर कृषी कायदे संसदेत रद्द
- गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव; आशिष शेलार यांना 1 लाखाचा ऑनटेबल जामीन मंजूर
- स्वातंत्र्य तर संघर्षातून मिळाले, भीक म्हणून मिळाल्या तर त्या पदव्या आणि पुरस्कार – कन्हैयाकुमार
- भ्रष्टाचार, खंडणी, वसुली यापलिकडे महाविकास आघाडीचे कुठले कर्तृत्व नाही – चंद्रकांत पाटील
- शरद पवारांनी सांगितलं, 2024 ला सुद्धा ठाकरे सरकारचं येणार अन् मुख्यमंत्री…; जितेंद्र आव्हाड