बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या कामाच्या व्यापाने आणि उरकाने जेवढे प्रसिद्ध आहेत, तेवढेच ते त्यांच्या आक्रमक स्वभावासाठी देखील राजकीय वर्तुळात परिचित आहेत. त्यांच्या याच अवताराचा एक नमुना आज सकाळी पुन्हा एकदा, बारामतीमधल्या देसाई इस्टेट इथल्या एका कार्यक्रमात पाहायला मिळाला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी
याठिकाणी एक कार्यक्रम पार पडत होता. ज्याला उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती होती. मात्र, त्याचवेळी या कार्यक्रमातल्या एका प्रसंगावरुन त्यांचा पारा चढला. एक व्यक्ती आपलं काम घेऊन अजित पवारांकडे आला. त्याने आपलं निवदेन त्यांच्या हातात सोपवलं. माझे पैसे एका व्यक्तीकडे अडकले आहेत. या निवेदनाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो, यात लक्ष घालून मला सहकार्य करावं, अशी विनंती त्याने या निवेदनातून त्यांच्याकडे केली.
“हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा पेगॅसस वेगळं नाही, तिथे माणसं मेली, इथे स्वातंत्र्य मेल”
यावेळी, हे निवदेन वाचल्यानंतर अजित पवार चांगलेच भडकले. “उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय,” अशा शब्दातत्यांनी संबंधित व्यक्तीला सुनावलं. तसेच, “बेकायदेशीर व्यवसाय कोण करत असेल, सावकारी करत असेल तर त्याला मोक्का लावला जाईल. तसेच चांगल्या सवयी लावा, नको ती कामे घेऊन येऊ नका,” असा इशाराही त्यांनी दिला.
उदयनराजेंची जनतेला आर्त साद, “बांधवांनो धीर सोडु नका, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत”
तसेच, त्यांनी बारामतीत आपल्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या चहाच्या टपरीचं उदघाट्न केलं. यानंतर, “हा चहा क्वालिटी आहे ना?” अशी विचारणा करत त्यांनी या कार्यकर्त्याच्या ‘कसदार चहा’ या टपरीवरच्या चहाची चव देखील चाखून पहिली. त्यामुळे अजित एकीकडे आजच्या पवारांच्या आक्रमकतेचा आणि दुसरीकडे त्यांच्या दिलदार आणि मनमिळाऊ स्वभावाचे एकाच वेळी दोन पैलू पुन्हा एकदा पहायला मिळाले.
Read Also :
- चांगल्या-वाईट कामचं प्रशस्तीपत्रं राहू द्या, राजकारण आणि टीका सोडून सध्या पुनर्वसन महत्त्वाचं
- पुन्हा एक हात मदतीचा: कोकणवासीयांसाठी आमदार महेश लांडगेंचे आवाहन
- तळीये दरड दुर्घटना : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत स्थानिक सांगतील तिथे पक्की घरे बांधून देणार- नारायण राणे
- पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मत्र्यांची मोठी घोषणा, जेईई मेनच्या तिसऱ्या सत्राच्या परीक्षेची पुन्हा संधी मिळणार
- नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, आज चिपळूण दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी