महाड : रायगडमधल्या महाडमध्ये डोंगरकडा कोसळून तब्बल ४४ लोकांना जीव गमवावा लागला. चिपळूण, खेडमधल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज केंद्रिय मंत्री नारायण राणे कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते आहेत.
‘म्हाडा’ने उचलली तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
यांनतर, आज सकाळी त्यांनी तळई गावची पाहणी केली. यांनतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, राज्य आणि केंद्र सरकारकडून या जागी पुन्हा चांगली आणि पक्की घरे बांधून देण्यात येतील. तसेच, स्थानिकांना तातडीने मदत मिळावी म्हणून, प्रांत स्तरावरच अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” असं त्यांनी सांगितलं.
‘कृष्णकुंज’वर एकाच मागणीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी, राज ठाकरे लवकरच घेणार मोठा निर्णय!
“या गावातच पुनर्वसन व्हावं अशी स्थानिकांची इच्छा आहे. त्यामुळे याच ठिकाणी सध्या तात्पुरती वसाहत बांधण्यात येणार आहे. केंद्राकडूनही स्थानिकांना मदत देण्यात येणार आहे. या घटनेची सविस्तर माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येणार आहे. त्यांनी स्वतःच मला या भागाची पाहणी करून अहवाल देण्यास सांगितलं आहे,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.
आमदार भरतशेठ गोगावले यांच्यासह बचावकार्याची टीम घटनास्थळी कशी पोहचली… वाचा सविस्तर…
तसेच, “या भागांत वारंवार येणारी पूर परिस्थती लक्षात घेता याठिकाणी कायमस्वरुपी एनडीआरएफची तुकडी ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. या घटनेची निश्चितच कुणाला कल्पना नव्हती. त्यामुळे दोषी कुणालाही धरता येणार नाही. या घटनेवरून कुणावर आरोप करणं देखील योग्य नाही,” असं सांगत त्यांनी, “दुर्घटनेत ज्यांची घरे जमीनदोस्त झाली आहेत त्यांना, पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येणार आहेत,” असे आश्वासन त्यांनी दिलं आहे.
Read Also :
- पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मत्र्यांची मोठी घोषणा, जेईई मेनच्या तिसऱ्या सत्राच्या परीक्षेची पुन्हा संधी मिळणार
- नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, आज चिपळूण दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी
- “हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा पेगॅसस वेगळं नाही, तिथे माणसं मेली, इथे स्वातंत्र्य मेल”
- उदयनराजेंची जनतेला आर्त साद, “बांधवांनो धीर सोडु नका, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत”