मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण सध्या राष्ट्रवादीच्या पक्षफुटीच्या केंद्रा भोवती फिरतांना दिसत आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारून सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु पक्षात कोणतीही फुट पडली नाही. असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हटलं आहे. त्यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“अजित पवारांना आता पुन्हा संधी नाही,” शरद पवारांचा मोठा घुमजाव
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष हा मूळ शरद पवारांचा आहे. त्या विचारांपासून वेगळे जाणे याला आम्ही गद्दारीच म्हणतो. सध्या संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये मात्र कार्यकर्त्यांमध्ये जात आहे. महाविकास आघाडीवर याचा कोणताही परिणाम होईल असे मला वाटत नाही. असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“शरद पवारांनी गुगली टाकली, भाजपसोबत जाणार नाही”
दरम्यान,अजित पवार आमचे नेते आहेत. असं सुप्रिया सुळे म्हणू शकते, मी नाही. राष्ट्रवादीत फुट नाही. परंतु त्यांची भूमिका ही पक्षविरोधी आहे. अजित पवार आमचे नेते असं म्हणलोच नव्हतो, असं म्हणत शरद पवार यांनी काल केलेल्या वक्तव्यावरून घुमजाव केला आहे. आज सातारा दौऱ्यावर असतांना दहिवडे याठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. अजित पवारांना पुन्हा संधी नाही. पहाटेच्या शपथविधीच्या वेळी संधी देण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की असं काही करणार नाही. त्यामुळे आता त्यांना पुन्हा संधी नाही. असं शरद पवारांनी म्हटलंय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळ शरद पवारांचा आहे. त्या विचारांपासून वेगळे जाणे याला आम्ही गद्दारीच म्हणतो. सध्या संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये मात्र कार्यकर्त्यांमध्ये जात आहे. महाविकास आघाडीवर याचा कोणताही परिणाम होईल असे मला वाटत नाही. #Maharashtrapolitics pic.twitter.com/5Pnvi6KNvQ
— Ambadas Danve (@iambadasdanve) August 25, 2023
READ ALSO :
हेही वाचा…पिंपरी-चिंचवड : उपमुख्यमंत्र्यांचा महापालिका प्रशासनाला ‘बुस्टर’, महापालिका आयुक्तांना दिली कौतुकाची थाप
हेही वाचा…“शिंदे-फडणवीसांनी क्लिनचीट दिली, पण आता थेट जप्तीचे आदेश”, भाजप आमदाराच्या अडचणी वाढल्या
हेही वाचा…“काॅंग्रेसमधील काही ठराविक लोकांनी टार्गेट करून पक्षाच्या बाहेर काढलं”,सत्यजीत तांबेंचा आरोप
हेही वाचा…शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची ‘नो कमेंट्’
हेही वाचा…राष्ट्रवादीतून शरद पवारांनी अजित पवारांची केली हाकालपट्टी, भाजपसोबत जाणार नाही