पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून भोसरी विधानसभा मतदार संघ ‘टार्गेट’ करण्यात आला आहे. त्याद्वारे भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचे ‘वादळ’ रोखण्याचा प्रयत्न केला जात असून, राष्ट्रवादीचे दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या नेत्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे लांडगेविरुद्ध राष्ट्रवादी असा एकतर्फी राजकीय सत्ता संघर्ष आगामी काळात पहायला मिळणार आहे.
सलग १५ वर्षे पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. मात्र, २०१४ पासून राष्ट्रवादीला उतरती कळा लागली. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपात प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी अशा तीनही विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला. चिंचवडमधून जगताप, पिंपरीतून शिवसेनेच्या तिकीटावर ॲड. गौतम चाबुकस्वार आणि भोसरीतून अपक्ष महेश लांडगे यांनी विधानसभा जिंकली. २०१४ मध्ये भाजपा राज्याच्या सत्तेत आले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना ताकद दिली.
परिणामी, २०१७ च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतील मोठा गट भाजपामध्ये दाखल झाला. त्यामुळे शहराच्या इतिहासात भाजपाची पहिल्यादा एकहाती सत्ता आली. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली. त्यावेळी भाजपातील किमान २० ते २५ नाराज नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल होतील, अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा संघटन कौशल्याचा कस लागला होता. मात्र, ऐनवेळी शिवसेनेत फुट पडली आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यामुळे शहरातील राजकीय गणित बदलले.
दरम्यान, भाजपाचे ‘बाहुबली’ आमदार लक्ष्मण जगताप प्रकृतीच्या कारणास्तव विश्रांती घेत आहेत. त्यामुळे एकाकी पडलेल्या शहराध्यक्ष लांडगे यांच्या मदतीला जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना भाजपाने मैदानात उतरवले. त्यांच्याकडे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. परंतु, भाजपाचा स्थानिक प्रभावी चेहरा म्हणून आमदार लांडगे यांचा ‘डॅमेज’ करण्याची रणनिती राष्ट्रवादीकडून आखली गेली आहे.
“मोदींकडून एकनाथ शिंदेंचा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उल्लेख”
भोसरीतच राष्ट्रवादीचे लक्ष का?
महाविकास आघाडीची सत्ता असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय दांडपट्टा चालू केला होता. त्यामुळे भाजपाचे माजी नगरसेवक वसंत बोराटे, संजय नेवाळे, प्रियांका बारसे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी राष्ट्रवादीच्या गळाला लागले. बोराटे यांच्या मोशी प्रभागातून भाजपाच्या पराभवाची सुरूवात होईल, असा दावा करण्यात आला. राष्ट्रवादीत संघटनात्मक बदल करण्यात आले आणि अजित गव्हाणे यांच्याकडे धुरा सोपवण्यात आली. महेश लांडगे आणि अजित गव्हाणे हे दोन्ही नेते २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीचे दावेदार आहेत. गव्हाणेंना ताकद देवून लांडगेंना रोखण्याचा निर्धार राष्ट्रवादीने केला. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वाधिक कार्यक्रम आणि संघटनात्मक उपक्रम चिंचवड, पिंपरीच्या तुलनेत भोसरीत जास्त होतात. कारण, भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री तथा उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे पक्षश्रेष्ठी पिंपरी-चिंचवडची आगामी निवडणूक स्थानिक प्रभावी नेता म्हणून महेश लांडगे यांच्या माध्यमातून लढवणार हे निश्चित आहे. तसेच, शिंदे-फडणवीस मंत्रीमंडळाच्या संभाव्य मंत्रीमंडळ विस्तारात भाजपाकडून लांडगे यांना मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. लांडगे यांची ताकद वाढल्यास महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसणार आहे. त्यामुळे भोसरीत राष्ट्रवादीकडून सर्वाधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
“मोदीजी.! आम्ही स्वप्न बघितले पण तुम्ही नसते, तर हा समृद्धी महामार्ग बनला नसता”; देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीच्या दिग्गजांची भोसरीत मोर्चेबांधणी…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी मतदार संघातील पदाधिकाऱ्यांनी ‘योद्धा @83’ क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले. या स्पर्धांसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहीत पवार यांच्यासह प्रदेश पातळीवर नेत्यांनी उपस्थिती लावली. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार सुनील शेळके, निलेश लंके यांच्यासह राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भोसरीतील कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. दुसरीकडे, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांच्यामाध्यमातूनही यांच्याकडूनही पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष केंद्रीत केले आहे. आमदार जगताप यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे चिंचवड विधानसभा राष्ट्रवादीला सोपी वाटते. पिंपरीमध्ये आमदार आण्णा बनसोडे यांच्यामाध्यमातून ‘फिल्डिंग’ लावण्यात आली असून, राष्ट्रवादीचा खरा अडथळा भोसरीतील आमदार महेश लांडगे आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या दिग्गजांनी भोसरीत मोर्चेबांधणी केली आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
Read also
- चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण…! पोलीस निलंबित, पत्रकारांना अटक, अन् वाचाळवीर नेत्यांची जीभ मात्र मोकाट
- कर्तव्यदक्ष अधिकारी नेत्यांना का खुपतंय…? तुकाराम मुंढेंच्या बदली मागे तानाजी सावंतंचा हात?
- शिंदें-फडणवीसांची जादू, एकनाथ खडसे म्हणाले, “खोक्यांची ताकद लागली म्हणून…”
- “बावनकुळेंच्या नावाचा साधा नामोख्खेल ही मोदींकडून न होणे ही बाब काही मनाला पडली नाही”
- 50 खोक्यांचा आरोप मावळला…! ठाकरे गटातील नेत्यांकडून बंडखोर आमदाराचं कौतुक