मुंबई : देशपातळीवर लम्पी या जनावरांना होणाऱ्या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थानसह महाराष्ट्रातही या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. या गंभीर विषयाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधिमंडळ कार्यालयात तातडीची पत्रकार परिषद घेतली.
दूग्ध व्यवसायावर गंभीर परिणाम करणारा हा आजार असून लसीकरण झाले नाही तर याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होईल, त्यामुळे या आजाराकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी अजित पवारांनी केली. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पशू संवर्धन मंत्री यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आजाराचा विम्यामध्ये अंतर्भाव नसल्याने शासनाने विमा कंपन्यांशी बोलून याचा अंतर्भाव करून घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
“गर्दी जमवण्यासाठी सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर ही वेळ आली असेल तर..;” अन् अजित पवार संतापले
तसचे अंतर्भाव होईपर्यंत जनावरं दगावल्यास शासनाने शेतकऱ्याला मदत केली पाहीजे, अशी मागणीही अजित पवारांनी केली. याबाबत आदरणीय शरद पवार साहेबांशी देखील चर्चा केली असून पवार साहेबांनी केंद्रीय मंत्री व सचिवांशी संपर्क केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात ठराविक जिल्ह्यात गाईंना या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाले आहे. या आजाराविषयी लोकांमध्ये गैरसमज मोठ्या प्रमाणावर असल्याने ते दूर करण्यासाठी जनजागृती करायला हवी. या आजाराविषयी काय खबरदारी घ्यावी याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करावा, अशी मागणी त्यांनी केली.
“शरद पवार अन् अजित पवार एकाच नाण्याच्या दोन बाजू, त्यामुळे दानवसारखं बरळू नका”
प्रतिबंधक लसींची निर्मिती देशात दोन कंपन्याच करत आहेत. असे असल्यास परदेशातून लसी मागवा, मात्र शेतकऱ्याचे जनावर या आजारातून बाहेर पडले पाहीजे. जनावरे दगावली तर त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या व्यवसायावर होईल, असे अजित पवारांनी म्हणाले. आगामी काळात साखर कारखाने सुरु होत असून कारखान्यात ऊस वाहून आणण्यासाठी बैलांची गरज लागते. जर या आजाराचा प्रादुर्भाव वाढला तर त्याचा मोठा फटका बसू शकेल, असे ते म्हणाले.
Read also
- “लाडू-पेढे पळवण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड”; मुख्यमंत्र्यांची सभा चर्चेत
- “भुमरेंच्या मागच्या सभेला केवळ 110 लोकं होती, यावेळी तो फ्लॉफ शो होऊ नये म्हणून कदाचित”
- “काही दिवसांनी पटोलेंच भाजपमध्ये येतील पण आम्ही त्यांना घेणार नाहीत”
- “फेसबुक लाईव्हवाला घरबशा पंतप्रधान लोकांच्या नशिबात नव्हता”
- “जयंत पाटील, त्यानंतर शरद पवारांचं भाषण झालं, पण तुमचं भाषण नाही”, अजित पवार म्हणाले,.