नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेत मोठा गोंधळ बघायला मिळत आहे. आतापर्यंत ६ वेळा सभागृह तहकुब करण्याचा निर्णय घेतला आहे. दिशा सालियन प्रकरणावरून शिवसेनेचे नेते भास्करराव जाधव यांना बोलू द्यावे,अशी विनंती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी केली. त्यावर अध्यक्षांनी आक्षेप नोंदवत भास्कर जाधव यांना बोलू न दिलं. त्यावर तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका, असं म्हणत जयंत पाटील यांनी वक्तव्य केलं. त्यानंतर सभागृहात सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी जयंत पाटलांना निलंबित करण्याची मागणी केली.
“मुंबई पालिकेत 1 कोटी रूपयात किती उंदिर मारले?” आशिष शेलारांचा सभागृहात सवाल
दिशा सालियन प्रकरण सध्या राज्याच्या विधानसभेत चांगलचं गाजत आहे. यावरून सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला. यावरून जंयत पाटलांनी विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यावरून शंभुराज देसाई यांनी जयंत पाटलांच्या निलंबणाची मागणी केली. त्यावर कामकाज मंत्री चंद्रकांत पाटलांनी निलंबणावर प्रस्ताव मांडून तो प्रस्ताव सत्ताधारी पक्षातील बहुमतावर मान्य करण्यात आला.
फोन टॅपिंग प्रकरण..! अध्यक्षांनी चर्चा करण्याची थांबवली, विरोधकांचा सभागृह त्याग
त्यानंतर अजित पवार यांनी यावर भाष्य केलं. माझी विनंती आहे की आपण भास्कर जाधव यांना थोडं बोलण्याची परवानगी द्यावी. तिकडच्या १४ लोकांना बोलायची परवानगी दिली. मी इकडनं एकटा बोललो आहे. सभागृह असं कसं चालवताय तुम्ही ? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच जंयत पाटलांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच सभागृहातील कामकाज दोन्ही बांजूच्या नेत्यांनी व्यवस्थित चालवलं पाहिजे. परंतु सध्या असं काही घडतांना दिसत नाही. त्यामुळे आम्ही सभात्याग करीत असल्याचं म्हणत अजित पवारांनी सभागृह सोडला. त्यानंतर सभागृहात भयान शांतता पसरली.
मोठी बातमी..! राऊतांच्या जामीन अर्जावर सही करणाऱ्यालाच शिंदेंनी पक्षात घेतलं
दरम्यान, आज अधिवेशनाच्या सुरूवातीलाच नाना पटोले यांनी रश्मी शुल्का प्रकरणावर भाष्य केलं. त्यानंतर सत्ताधारी पक्षांनी आदित्य ठाकरेंना घेरत दिशा सालियन प्रकरणावरून सभागृहात डोक्यावर घेतलं. यानंतर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांनामध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. त्यामुळे सभागृह अध्यक्षांना जवळपास सहा वेळा तहकुब करावं लागलं.
Read also
- राजकारण तापलं…!”मला सुरक्षा द्या, रिया चक्रवर्तीची मागणी..! AU चा आदित्य ठाकरेंशी संबंध नाही”
- “दिशा सालियन प्रकरणाची SIT मार्फत चौकशी..!” फडणवीसांची घोषणा, सभागृह 6 वेळा तहकुब
- “आफताबाची जशी नार्को टेस्ट झाली तशी आदित्य ठाकरेंची करा”; नितेश राणेंची सभागृहात मागणी
- दिशा सालियन, सुशांत सिंह प्रकरण पुन्हा चर्चेत…! राज्यसभेत मोठा गदारोळ
- “गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकार्न”, विरोधकांची नवी घोषणा, परिसर दणाणला