मुंबई : सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. लोकसभेत शिंदे गटाचे लोकसभा नेते राहुल शेवाळे यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. हा मुद्दा आज विधानसभेत देखील गाजला. शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी हा मुद्यावरून प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर नितेश राणे यांनी देखील यावरून चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर विधानसभेत मोठा गदारोळ बघायला मिळाल्याने तालिका अध्यक्षांनी सभागृह दहा मिनिटांसाठी तहकुब केला.
“आमदारांच्या कपबशा टॉयलेट मध्ये धुतांनाचा व्हिडीओ व्हायरल”; राष्ट्रवादीचा खोचक टोला
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात जसं आफताब पुनावाची नार्को टेस्ट झाली आणि सत्य बाहेर आलं. तसंच आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा. सुशांतसिंह केसमधील सत्य समोर येईल, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. सुशांत सिंह राजपुत केसचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा फक्त आदित्य ठाकरे यांचंच नाव का समोर येतं? असा सवालही त्यांनी केला आहे.
“जनतेच्या पैश्यांची रेवडी करून मुठभर लोकांच्या घश्यात घातली”; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
काल लोकसभेत राहुल शेवाळे यांनी या प्रकरणावर भाष्य केलं. अभिनेता सुशांत सिंह यांच्या केससंदर्भात रिया चक्रवर्तीला तब्बल 44 फोन आले आहेत. यामध्ये AU असा उल्लेख मुंबई पोलिसांनी केला आहे. तर बिहार पोलिसांनी याचा उल्लेख आदित्य ठाकरे असा केला आहे. याची संपुर्ण चौकशी बाहेर आली पाहिजे अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली.
“तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करा”; राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना ताकीद
त्यावरून आज सभागृहात भरत गोगावले आणि नितेश राणे यांनी हा मुद्दा उचलून धरला. यावरून सभागृहात मोठा गदारोळ बघायला मिळाला. त्यामुळे सभागृह दोन वेळा तालिका अध्यक्षांना तहकुब करावा लागला. त्यामुळे आता यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- दिशा सालियन, सुशांत सिंह प्रकरण पुन्हा चर्चेत…! राज्यसभेत मोठा गदारोळ
- “गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकार्न”, विरोधकांची नवी घोषणा, परिसर दणाणला
- “मुंबई पालिकेत 1 कोटी रूपयात किती उंदिर मारले?” आशिष शेलारांचा सभागृहात सवाल
- फोन टॅपिंग प्रकरण..! अध्यक्षांनी चर्चा करण्याची थांबवली, विरोधकांचा सभागृह त्याग
- मोठी बातमी..! राऊतांच्या जामीन अर्जावर सही करणाऱ्यालाच शिंदेंनी पक्षात घेतलं