मुंबई : मागील काही दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यातच राज्यातील इतर पक्षातील दुसऱ्या फळीतील नेते दुसऱ्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांबद्दल फक्त प्रसिद्धी मिळवण्याची कोणतीही भाषा वापरताना दिसत आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कडक शब्दात ताकीद दिली आहे.
फोटो मॉर्फचा मुद्दा विधानसभेत..! जयंत पाटलांनी फोटोच दाखवून भाजपला पकडलं कोंडीत” भुजबळही हसले
राज ठाकरे यांनी मनसेबरोबर राज्यातील इतर पक्षातील नेत्यांच्या कार्यकर्त्यांनाही समज दिली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांचा भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स ह्याच्याने हे सगळे शेफारले आहेत. असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
निमगाव चोभा ग्रामपंचायतीत कानिफनाथ ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय
इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही. माझ्या पक्षातल्या कोणालाही, पक्षांर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला, माझ्याशी बोला. पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा. असं देखील त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे नवे राष्ट्रपती”, अमृता फडणवीसांचं वक्तव्य
पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा. ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे. ह्याची नोंद घ्या. असा इशारा देखील राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना अशी ताकीद दिल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
Read also
- राऊतांना ठेचण्याची धमकी देणाऱ्या बांगरांना सेनेचं प्रत्युत्तर, म्हणाले, “नुसती ईडी अन् सीबीआय..;”
- “तो पर्यंत डोक्यावरचे केस कापणार नाही,” भाजप आमदार राम कदमांनी घेतली मोठी शपथ
- घरी गाढव प्राणी का पाळता ? गुणरत्ने सदावर्तेंनी दिलं उत्तर, म्हणाले,..
- चंद्रकांत पाटलांचा तो विषय…! भुजबळांनी झोळी पसरवली, फडणवीसांनी थेट पुस्तकच वाचलं
- “अरे संजय बेटा….! थांब जरा, माझं ऐक, खाली बस्..;”अन् अजित पवारांनी सभागृहातच