नागपूर : मुख्यमंत्र्यांबद्दल अजून काही बोललं तर संजय राऊतांना ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी धमकी बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी दिली. तसेच संजय राऊतांचा त्यांनी पिसाळलेला कुत्रा असाही संतोष बांगरांनी उल्लेख केला. त्यावर आता शिवसेनेचे आमदार आणि संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी संतोष बांगर यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
निमगाव चोभा ग्रामपंचायतीत कानिफनाथ ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय
संतोष बांगर यांना प्रत्युत्तर देताना सुनील राऊत म्हणाले की, संतोष बांगर यांच्या या गोष्टी शोभत नाहीत. निवडणूक लागू दे, शिवसैनिक या निवडणुकीत संतोष बांगरला ठेचून काढतील हे लक्षात घ्या. अशी खोचक प्रतिक्रिया सुनील राऊत यांनी दिली आहे. तसेच संतोष बांगर यांनी ठेचण्याच्या गोष्टी करू नये, शिवसैनिक काही मजोर नाही, त्यामुळे आम्ही त्यांना पाहून घेऊ, अशा इशाराही त्यांनी दिला आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे नवे राष्ट्रपती”, अमृता फडणवीसांचं वक्तव्य
जो संजय राऊत भाजपला न जुमानता, न घाबरता काम करतोय. तो संजय राऊत म्हणजे संतोष बांगर नव्हे, की नुसती ईडी आणि सीडीच्या नोटीस गेल्यानंतर भाजपखाली लोटांगण घातलं. संजय राऊत न झुकता जेलमध्ये गेले. ते साडेतीन महिने जेलमध्ये राहिली. पण ते कधीही झुकले नाहीत. असं म्हणत त्यांनी संतोष बांगर यांचा समाचार घेतला.
दरम्यान, राज्याच्या हिवाळी अधिवेशनात देखील आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना डिवचण्याचा प्रयत्न केला. परंतु बंडखोर आमदार आणि मंत्री शंभुराज देसाई आणि गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना एका शब्दात खाली बसवलं. त्यामुळे सध्या बंडाळीचा मुद्दा अजूनही राज्यात तापलेला आहे.
Read also
- “तो पर्यंत डोक्यावरचे केस कापणार नाही,” भाजप आमदार राम कदमांनी घेतली मोठी शपथ
- घरी गाढव प्राणी का पाळता ? गुणरत्ने सदावर्तेंनी दिलं उत्तर, म्हणाले,..
- चंद्रकांत पाटलांचा तो विषय…! भुजबळांनी झोळी पसरवली, फडणवीसांनी थेट पुस्तकच वाचलं
- “अरे संजय बेटा….! थांब जरा, माझं ऐक, खाली बस्..;”अन् अजित पवारांनी सभागृहातच
- फोटो मॉर्फचा मुद्दा विधानसभेत..! जयंत पाटलांनी फोटोच दाखवून भाजपला पकडलं कोंडीत” भुजबळही हसले