नागपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी आघाडीतील नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरण उजेडात आलं. या प्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना अलिकडेच शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर क्लिनचीट देण्यात आली आहे. परंतु यासदंर्भात पुणे पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट पुणे न्यायालयाने फेटाळला. यामुळे रश्मी शुक्ला अडचणीत येण्याची शक्यता आहे. याचे पडसाद आज विधानसभेत देखील बघायला मिळाले.
“तो पर्यंत डोक्यावरचे केस कापणार नाही,” भाजप आमदार राम कदमांनी घेतली मोठी शपथ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. सुरूवातीलाच नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी केली. परंतु विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोले यांची मागणी फेटाळली. त्यानंतर आघाडीच्या नेत्यांनी सभागृहात गोंधळ माजवला. तरीही विधानसभा अध्यक्षांनी प्रश्नोत्तरांचा तास सुरू ठेवला. मात्र विरोधकांनी यावेळी गोंधळ घालत, ओम्, ओ्म असा नाम जपत करत इडी सरकारचा धिक्कार असो, अशी सभागृहातच घोषणा दिली.
घरी गाढव प्राणी का पाळता ? गुणरत्ने सदावर्तेंनी दिलं उत्तर, म्हणाले,..
राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या काळात काॅंग्रेसचे नेते नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, शिवसेना खासदार संजय राऊत, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप करण्यात आले होते. याप्रकरणी नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आणि राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांच्यावर ठपका ठेवला होता.
चंद्रकांत पाटलांचा तो विषय…! भुजबळांनी झोळी पसरवली, फडणवीसांनी थेट पुस्तकच वाचलं
दरम्यान, यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील यावरून प्रश्न उपस्थित केले. तसेच यावरून राज्यातील नेत्यांचे अशा पद्धतीने फोन टॅपिंग केल्याने व्यक्तींच्या अधिकारांवर गदा आणली जात आहे. हे योग्य नाही. असं म्हणत यावर कारवाई करावी अशी मागणी देखील अजित पवार यांनी केली. मात्र तरीही अध्यक्षांनी ते मान्य ने केल्याने विरोधी पक्षांनी सभा त्याग केला.
Read also
- मोठी बातमी..! राऊतांच्या जामीन अर्जावर सही करणाऱ्यालाच शिंदेंनी पक्षात घेतलं
- “आमदारांच्या कपबशा टॉयलेट मध्ये धुतांनाचा व्हिडीओ व्हायरल”; राष्ट्रवादीचा खोचक टोला
- “जनतेच्या पैश्यांची रेवडी करून मुठभर लोकांच्या घश्यात घातली”; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
- “तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करा”; राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना ताकीद
- राऊतांना ठेचण्याची धमकी देणाऱ्या बांगरांना सेनेचं प्रत्युत्तर, म्हणाले, “नुसती ईडी अन् सीबीआय..;”