नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचं नागपूर येथील हिवाळी अधिवेशन वादळी ठरत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला विविध मुद्यांवरून कोंडीत पकडलं आहे. यातच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक व्हिडीओ ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
चंद्रकांत पाटलांचा तो विषय…! भुजबळांनी झोळी पसरवली, फडणवीसांनी थेट पुस्तकच वाचलं
नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील एका टॉयलेटमध्ये एक वेटर कप बशा धुतांनाचा व्हिडीओ अमोल मिटकरी यांनी ट्विट केला आहे. त्यावरून त्यांनी हजारो कोटीचे टेंडर कंत्राट दाराला दिल्याने ही वेळ आली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता हा विषय देखील सभागृहात मांडला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“अरे संजय बेटा….! थांब जरा, माझं ऐक, खाली बस्..;”अन् अजित पवारांनी सभागृहातच
यासंदर्भात अमोल मिटकरी यांनी व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनाताली आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटीचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था, असं म्हणत त्यांनी आझादी का अमृतमहोत्सव असा हॅशटॅग वापरून सरकारला अडचणीत पकडलं आहे.
फोटो मॉर्फचा मुद्दा विधानसभेत..! जयंत पाटलांनी फोटोच दाखवून भाजपला पकडलं कोंडीत” भुजबळही हसले
दरम्यान, मागील दोन दिवसापासून विरोधक सत्ताधारी पक्षांवर भारी पडत आहेत. नागपूर येथील एनआयटी भुखंड संदर्भात मुख्यमंत्री राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे. तर सीमावादाच्या प्रश्नावरूनंही विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर ताशोेरे ओढले आहेत. यातच आता हा घटनेने सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटीचे टेंडर कंत्राट दाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था.#आझादीकाअमृतमहोत्सव. pic.twitter.com/pi5rJnJxfm
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 21, 2022
Read also
- “जनतेच्या पैश्यांची रेवडी करून मुठभर लोकांच्या घश्यात घातली”; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
- “तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करा”; राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना ताकीद
- राऊतांना ठेचण्याची धमकी देणाऱ्या बांगरांना सेनेचं प्रत्युत्तर, म्हणाले, “नुसती ईडी अन् सीबीआय..;”
- “तो पर्यंत डोक्यावरचे केस कापणार नाही,” भाजप आमदार राम कदमांनी घेतली मोठी शपथ
- घरी गाढव प्राणी का पाळता ? गुणरत्ने सदावर्तेंनी दिलं उत्तर, म्हणाले,..