नागपूर : जनतेच्या पैश्यांची रेवडी करून काही मुठभर लोकांच्या घश्यात ही घातली आहे. जी आर्थिक शिस्त महाविकास आघाडी सरकारने लावली होती, ती सगळी शिस्त शिंदे सरकारने पुर्णपणे बिघडवली. विकास कामे मंजूरी करतांना केवळ राजकीय दृष्टीकोन ठेवला जाऊ नये जिल्हा नियोजनाचा स्थगित केलेला निधी खर्च करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने ऑगस्टमध्ये पावसाळी अधिवेशनात 25,836 कोटींच्या तर हिवाळी अधिवेशनात 52 हजार 3237 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या असल्याचं छगन भुजबळांनी म्हटलं आहे. त्यांनी आज सभागृहात शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.
“अरे संजय बेटा….! थांब जरा, माझं ऐक, खाली बस्..;”अन् अजित पवारांनी सभागृहातच
एकुण 78 हजार कोटींपेक्षा अधिक पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. सरकारच्या सहा महिन्यांच्या कालावधीत 78 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. एकूण अर्थसंकल्पाच्या 10 टक्क्यांपेक्षा अधिक खर्चाच्या पुरवणी मागण्या वर्षभरात मांडण्यात येऊ नयेत, असे संकेत आहेत. पण सरकारने वित्तीय संकेत धाब्यावर बसवले आहे. असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
फोटो मॉर्फचा मुद्दा विधानसभेत..! जयंत पाटलांनी फोटोच दाखवून भाजपला पकडलं कोंडीत” भुजबळही हसले
आदिवासी पालकांनी आपल्या मुलांना पैशांसाठी वेठबिगारी करिता विकण्याचा प्रकार दुर्देवी असून यापुढे अशा घटना घडू नये यासाठी शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या ? आदिवासी विकास विभागाला मोठा निधी दिला जातो मात्र तो या गरीब आदिवासी बांधवापर्यंत पोहचत नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला. एव्हढी भीषण गरिबी या आदिवासी लोकांमध्ये असते नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात १८ पेक्षा अधिक मुलांची वेठबिगार म्हणून त्यांच्याच पालकांकडून विक्री झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या समाजाला आपण थेट मदत मिळावी यासाठी कार्यवाही करणार आहोत की नाही अशी भूमिका मांडली.
Read also
- “तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करा”; राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना ताकीद
- राऊतांना ठेचण्याची धमकी देणाऱ्या बांगरांना सेनेचं प्रत्युत्तर, म्हणाले, “नुसती ईडी अन् सीबीआय..;”
- “तो पर्यंत डोक्यावरचे केस कापणार नाही,” भाजप आमदार राम कदमांनी घेतली मोठी शपथ
- घरी गाढव प्राणी का पाळता ? गुणरत्ने सदावर्तेंनी दिलं उत्तर, म्हणाले,..
- चंद्रकांत पाटलांचा तो विषय…! भुजबळांनी झोळी पसरवली, फडणवीसांनी थेट पुस्तकच वाचलं