नाशिक : अलिकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक महानगरपालिकेतील जवळपास 11 माजी नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. यातच आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना नाशिकमधून मोठा धक्का बसला आहे. नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख भाऊ चौधरी आणि सुनिप पाटील यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.
घरी गाढव प्राणी का पाळता ? गुणरत्ने सदावर्तेंनी दिलं उत्तर, म्हणाले,..
त्याआधी शिवसेना नाशिक जिल्ह्या संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत असल्याचं ट्विट खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटलांचा तो विषय…! भुजबळांनी झोळी पसरवली, फडणवीसांनी थेट पुस्तकच वाचलं
तसेच भाऊ चौधरी आणि सुनिल पाटील यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांचे मनापासून स्वागत आहे. आमच्या भूमिकेला समर्थन अनेकांनी दिले. आमच्यावर लोकं विश्वास दाखवत आहे. ही सगळी आमची जीवाभावाची माणसे आहेत. आपला एकच अजेंडा सर्व सामान्यांना न्याय देणे, कोण काय बोलेल याकडे आपण लक्ष द्यायचे नाही. काम करतो म्हणून 4500 ग्रामपंचायती निवडून आणल्या ही कामाची पोच पावती आहे. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
“अरे संजय बेटा….! थांब जरा, माझं ऐक, खाली बस्..;”अन् अजित पवारांनी सभागृहातच
आपण जे काम करतोय यामुळे लोकांच्या छातीत धडकी बसलीये पाया खालची वाळू सरकली आहे. भाऊ आणि सुनिल यांनी जो विश्वास दाखवला त्याला कधी तडा जावू देणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, संजय राऊतांच्या जामीनावर स्वाक्षरी करणाऱ्या जामीनदारालाच शिंदेंनी त्यांच्या पक्षात घेतलं आहे. भाऊसाहेब चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे #नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी तसेच नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी #बाळासाहेबांची_शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/mgDkyuSIc3
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 21, 2022
Read also
- “आमदारांच्या कपबशा टॉयलेट मध्ये धुतांनाचा व्हिडीओ व्हायरल”; राष्ट्रवादीचा खोचक टोला
- “जनतेच्या पैश्यांची रेवडी करून मुठभर लोकांच्या घश्यात घातली”; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
- “तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करा”; राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना ताकीद
- राऊतांना ठेचण्याची धमकी देणाऱ्या बांगरांना सेनेचं प्रत्युत्तर, म्हणाले, “नुसती ईडी अन् सीबीआय..;”
- “तो पर्यंत डोक्यावरचे केस कापणार नाही,” भाजप आमदार राम कदमांनी घेतली मोठी शपथ