नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. मागील दिवसात भुंखडवरून विरोधकांनी मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आज अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्याच्या अगोदर विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवरच जोरदार घोषणाबाजी दिली.
“तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करा”; राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना ताकीद
राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी घोषणाबाजी दिली. घेतले खोके, भुखंड ओके, दिल्लीचे मिंधे एकनाथ शिंदे, राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव, धिक्कार असो धिक्कार असो, मिंधे सरकारचा धिक्कार असो, बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. राजीनामा द्या, राजीनामा द्या, मुख्यमंत्री राजीनामा द्या, महापुरूषांचा अपमान करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.
राऊतांना ठेचण्याची धमकी देणाऱ्या बांगरांना सेनेचं प्रत्युत्तर, म्हणाले, “नुसती ईडी अन् सीबीआय..;”
त्याचबरोबर भाजप सरकारचा धिक्कार असो, भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, भूखंडाचा श्रीखंड खाल्ला कुणी, मुख्यमंत्री मुख्यमंत्री, गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राल पॉपकार्न अशा जोरदार घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर आजही दणादणून सोडला.
“तो पर्यंत डोक्यावरचे केस कापणार नाही,” भाजप आमदार राम कदमांनी घेतली मोठी शपथ
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
Read also
- “मुंबई पालिकेत 1 कोटी रूपयात किती उंदिर मारले?” आशिष शेलारांचा सभागृहात सवाल
- फोन टॅपिंग प्रकरण..! अध्यक्षांनी चर्चा करण्याची थांबवली, विरोधकांचा सभागृह त्याग
- मोठी बातमी..! राऊतांच्या जामीन अर्जावर सही करणाऱ्यालाच शिंदेंनी पक्षात घेतलं
- “आमदारांच्या कपबशा टॉयलेट मध्ये धुतांनाचा व्हिडीओ व्हायरल”; राष्ट्रवादीचा खोचक टोला
- “जनतेच्या पैश्यांची रेवडी करून मुठभर लोकांच्या घश्यात घातली”; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप