नागपूर : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांचा संबंध होता का? तसेच रिया चक्रवर्तीच्या फोनवर AU नावाने तब्बल 44 वेळा फोन आले आहेत ? त्याचा उलगडा झाला पाहिजे. याचा अन् आदित्य ठाकरेंचा काय संबंध आहे. याची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी शिंदे गटाचे लोकसभेचे नेते राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली. त्यावरून आज राज्याच्या विधानसभेतही तीच मागणी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी लावून धरल्याने सभागृहात मोठा गोंधळ बघायला मिळाला.
फोन टॅपिंग प्रकरण..! अध्यक्षांनी चर्चा करण्याची थांबवली, विरोधकांचा सभागृह त्याग
यासंदर्भात शिवसेनेचे नेत्या संजया घाडी यांनी रिया चक्रवर्तीचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात रिया चक्रवर्तींनी याप्रकरणाबाबत मोठा खुलासा केला आहे. मुंबई पोलिसांवर या प्रकरणी काही राजकीय दबाव आहे का?AU चा अर्थ आदित्य ठाकरे असा आहे का ? त्यावर रिया चक्रवर्ती म्हणाली की, माझी एक मैत्रीण आहे. तीचं नाव अनया उदास असून तिचा नंबर मी AU म्हणून सेव केला आहे. परंतु लोकांची त्याचा अर्थ आदित्य ठाकरे घेतल्याचं रियाने सांगितलं आहे.
मोठी बातमी..! राऊतांच्या जामीन अर्जावर सही करणाऱ्यालाच शिंदेंनी पक्षात घेतलं
तसेच पुढे ती म्हणाली की, पुन्हा याच्याशी आदित्य ठाकरेंशी संबंध जोडला जात आहे. मी आचपर्यंत आदित्य ठाकरेंशी कधीही भेटलो नाही, माझ्याकडे त्यांचा नंबरही नाही, मला प्रोटेक्ट करण्यासाठी राजकीय दबाव आणला जात आहे. असं म्हटलं जातंय. मात्र तसं काहीह नाही, मला उटल प्रोटेक्शनची गरज असल्याचंही रियाने सांगितलंय.
“आमदारांच्या कपबशा टॉयलेट मध्ये धुतांनाचा व्हिडीओ व्हायरल”; राष्ट्रवादीचा खोचक टोला
दरम्यान, आज दिवसभरात याप्रकरणावरून विधानसभेचं कामकाज काही तासचं चाललं. अनेक वेळा विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या गोंधळामुळे सभागृह तहकुब करण्यात आलं. त्यामुळे येत्या काही दिवसात यावरून राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
राहुल शेवाळे विडियो पाहावा!@shewale_rahul pic.twitter.com/STY3Wnz8Fv
— Sanjana Ghadi – संजना घाडी (@GhadiSanjana) December 21, 2022
Read also
- “दिशा सालियन प्रकरणाची SIT मार्फत चौकशी..!” फडणवीसांची घोषणा, सभागृह 6 वेळा तहकुब
- “आफताबाची जशी नार्को टेस्ट झाली तशी आदित्य ठाकरेंची करा”; नितेश राणेंची सभागृहात मागणी
- दिशा सालियन, सुशांत सिंह प्रकरण पुन्हा चर्चेत…! राज्यसभेत मोठा गदारोळ
- “गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकार्न”, विरोधकांची नवी घोषणा, परिसर दणाणला
- “मुंबई पालिकेत 1 कोटी रूपयात किती उंदिर मारले?” आशिष शेलारांचा सभागृहात सवाल