ठाणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काल तिने शरद पवार यांच्यावर फेसबुक पोस्ट केली होती. त्यामुळे तिच्यावर मुंबई, ठाण्यात आणि त्यानंतर पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच तिच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर लावून धरली होती. अशातच पोलिसांनी तिला अटक केली आहे. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तिला उपचाराची गरज असल्याचं म्हटलं आहे.
“अंगावर भगवी वस्त्रे अन् हातात हनुमानाची मुर्ती घेतली म्हणजे तु हिंदूची नेता नाही”
इतक्या खालच्या पातळीवर टिका करण्याची या अगोदर पद्धत नव्हती. सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष कुणीच अशा पद्धतीचे वक्तव्य करू नयेत. या बद्दल मी तीव्र शब्दात निषेध करतो. अशा मनोरूग्ण लोकांना मानसिक उपचाराची नितांत गरज आहे. त्यांना चांगल्या दवाखान्यात नेऊन उपचार दिले पाहिजे. असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. केतकी चितळेंनी केलेली पोस्ट अत्यंत खालच्या दर्जाची असून तिच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली होती. . समाजात तेढ निर्माण करण्याचे कृत तसेच दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना निर्माण होईल अशा पद्धतीची पोस्ट केल्याने तिच्यावर कलम 505(2), 500, 501,153 ए नुसार कळवा पोलीस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे.
“हिंमत असेल तर अकबरुद्दीन ओवैसींचे दात तोडून दाखवा”; नवनीत राणांचे ठाकरे सरकारला पुन्हा आव्हान
केतकी चितळेंनी या अगोदर देखील असे वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यामुळे तिच्यावर आतापर्यंत ठाणे, पुणे आणि सातारा अशा तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी केतकी चितळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तिला ठाण्यातून ताब्यात घेतलं आहे. केतकी चितळे विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाई बद्दल राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी देखील केतकी चितळ्याचा समाचार घेतला आहे. चि चि चवताळीस बाई तू महिला असली तरी छपरीच तु, संस्कार नसलेली केतकी, इतकीशी कशी चवताळीस हरामखोर विकृती, मनोरुग्ण तुला चपलेने 100 मारून 1 मोजले पाहीजे. कशात ना मशात केतकीबाई तमाशात , लवकरच जंगी चोपाची गरज आहे हिला ,मिळणारच बाई तुला चोप. असं रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.
Read also:
- अखेर केतकी चितळेला पोलिसांनी घेतलं ताब्यात; जितेंद्र आव्हाडांनी मानले पोलिसांचे आभार
- त्यांच्यासोबत मतभेद जरूर आहेत, मात्र अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चुक, यांचा छडा लावा; राज ठाकरे
- “नवनीत राणा या आधी बारमध्ये काम करत होत्या”
- “आजची सभा हि शंभर सभेंचा बाप, विरोधकांच्या पोटदुखीवर आजच्या सभेत उपचार होतील”
- कार्यकर्ता हा वेडा असतो, तुम्ही आमच्या बापावर लिहाल तर..; जितेंद्र आव्हाडांचा कडक इशारा