मुंबई : राज्याचे अर्थसंकल्प संपण्यासाठी थोडेच दिवस राहिले आहेत. या अर्थसंकल्पात विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तर सत्ताधारी पक्षांनी देखील त्यांना प्रत्युत्तर देण्याची एकही संधी सोडली नाही. अशातच आज विधानसभेच्या 10 आमदारांचा कार्यकाळ संपणार असल्याने त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौफेर फडकेबाजी करत सभागृहात यामुळे एकदमच हशा पिकला.
कोल्हापूर उत्तरेत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप लढत; भाजपचे विराट शक्तिप्रदर्शन कोणाच्या पथ्यावर?
सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, यांच्यासह रवींद्र फाटक, दिवाकर रावेत. सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर, प्रसाद लाड, संजय दौंड या दहा सदस्यांचा कालावधी जुलै महिन्यांत संपत आहे. त्यांना विधानसभेत निरोप देण्यात आला. त्यावेळी अजित पवारांनी त्यांच्या कामाचं कौतुक करत जोरदार फडकेबाजी केली.
धनंजय मुंडेंनी स्वत:ची सहा मुले तसेच अनेक बायकाही लपवल्या; करूणा मुंडेंचा गंभीर आरोप
अजित पवार म्हणालेत की, खरंतर त्यांच्या नावातच प्रसाद आणि लाड आहे. आता कुणी कुणाचे लाड केले आणि कुणी कुणाला प्रसाद दिला, हे काही सांगता येत नाही. आता ते सासरेबुवा झालेत, त्यामुळे त्यांच्यावर मी फार घसरत नाही. त्यांचे महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वाशी असणारे संबंध बघता. त्यांना नक्कीच पुन्हा संधी मिळू शकणार आहे. असंही अजित पवार म्हणालेत.
मुख्यमंत्र्याच्या मेहुण्यावर ईडीचं शुक्लकाष्ठ कायम; दुसऱ्या मालमत्तेवर देखील कारवाईचा बडगा
प्रसाद लाड यांच्यावर मिश्कील पणे टिप्पणी करत अजित पवार म्हणाले की, मला आठवतंय की आमच्या पक्षातूनही त्यांना सभागृहात आणण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु तेव्हा थोडी गडबड झाली अन् काही मतं फुटली. त्यामुळे तेव्हा संधी हुकली आणि ते भाजपमध्ये गेले.
Read also:
- योगीच्या शपथविधीसाठी विरोधी पक्षांसह अंबानी, अदानी उपस्थित राहण्याची शक्यता
- कितीही हल्ला करा, आमचा महाविकास आघाडीचा मजबुत किल्ला; रोहित पवारांचा भाजपला टोला
- राजकीय हेतूने कुणाला तरी त्रास देण्याचा कार्यक्रम ईडीने हाती घेतलाय :शरद पवार
- ऐरे गैरे नथ्थू खैरे, बीडचा सातबारा यांचा आहे का? जयदत्त क्षीरसागरांचा राष्ट्रवादीला संतप्त सवाल
- मग वडापावची गाडी असलेल्या शिवसैनिकांवर इडी कारवाई करेल; पाटणकरांवर झालेल्या कारवाईनंतर राऊतांची प्रतिक्रिया