नाशिक : मुंबईत अनेक कार्यालये दिल्लीला हलवली असती तर समजू शकलो असतो, मात्र ती अहमदाबादला हलवण्यात आली. याचा अर्थ मराठी माणसांवरचे प्रेम आणि मुंबईचे महत्व कमी करून अहमदबादला देण्याचं काम सुरू आहे. भाजपचं मुंबईवर बेगडी प्रेम आहे, अशी टिका विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी आमित शहा यांच्या दौऱ्यावरून केली आहे.
“तुमची विचारधारा काँग्रेस आणि सेनेची आहे ती सांभाळा”; संजय गायकवाड
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांनी आज सकाळी लालबागच्या राजाचं दर्शन घेतले आहे. त्याचबरोबर ते भाजपच्या काही नेत्यांची बैठक देखील घेणार आहेत. अमित शहा गणपती बाप्पाच्या दर्शनाला आले आहेत. मात्र मुंबईवर बेगडी प्रेम दाखवायचे काम त्यांनी केले आहे. महाराष्ट्र शोषित राहिला आहे. या सर्वांवर महाराष्ट्र मात करेल. बुलेट ट्रेनच्या कामासाठी येण्यापेक्षा नेते मंडळींनी शेतकऱ्यांच्या वावरात यावे, अशी टिका अंबादास दानवे यांनी अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावरून केली आहे.
बुलढाण्यात शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या सैनिकांचा तुफान राडा
शिवसेनेला पेंग्विन सेना का म्हणू नये, असा टोला आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावाला होता. याला आता शिवसेनेने प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना कोणती आणि कशी आहे, हे निवडणुकीच्या मैदानात स्पष्ट होईल. आशिष शेलारच काय सर्व विरोधकांना ते दाखवून देईल, असा इशारा अंबादास दानेवेंनी भाजपला दिला आहे.
“52 पत्ते कितीही पिसले तरी त्यातील चार एक्के भाजपकडेच आहेत”; सुधीर मुनगंटीवार
महाविकास आघाडी सरकार असताना अनेक निर्णयांचा पाठपुरवठा केला. मात्र राज्यपालांनी तत्परता दाकवली नाही. आता शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात प्रलंबित 12 आमदारांच्या यादीवर निर्णय लवकर होणार आहे. यावरून राज्यपालांची तत्परता दिसून येते, असा टोला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे. म्हणजे ज्या निर्णयांसाठी दोन-दोन, तीन-तीन वर्षे वाट पाहावी लागत होती, ते निर्णय दोन-तीन मिनिटांत घेतले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात याविषयी निश्चित भूमिका घेऊ, असंही दानवे म्हणाले.
Read also
- “चापलुसी करून 5 कोटी कमावणे हे सोपे आहे”; शिवा मोहोड यांचा मिटकरींवर आरोप
- “तुम्ही गोधडीत नव्हता तेव्हापासून आम्ही..”; गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
- “मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव”; केंद्रीय मंत्री अमित शहाचं मराठीत सुचक ट्विट
- “..तर शिवसेना स्टाईलने त्यांचे थोबाड फोडू”; बुलढाण्यातील राड्यानंतर संजय गायकवाडांना शिवसेनेचा इशारा
- एसटीच्या 800 चालकांवर बेरोजगार होण्याची वेळ ; पडळकर, खोत, सदावर्ते कोणत्या बिळात जाऊन लपले ?