मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका महिलेच्या संदर्भातील प्रकरणात अकोल्यातील एका महिला पदाधिकाऱ्याला 10 लाख रूपये देऊन निपटवले. यानिमित्ताने मिटकरींनी तीन दिवस अकोल्याच्या विश्रामगृहावर ठेवलेली पुण्यातील पदाधिकारी कोण होती? असा सवाल शिवा मोहोड यांनी उपस्थित केला. यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी शिवा मोहोड यांच्यावर 5 कोटीची मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण लागलं आहे.
बुलढाण्यात शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या सैनिकांचा तुफान राडा
आमदार अमोल मिटकरी साहेबांनी 5 कोटीची मानहानीची नोटीस पाठवली आहे. 5 कोटी त्यांनी वर्षभरात कमावले. पण माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील मुलाला 5 कोटीची किंमत माहिती आहे. घाम जेव्हा गाळतो ना, तेव्हा 5 कोटी रुपये मिळवले जातात. चापलुसी करून पैसे कमावणे हे सोपे आहे, म्हणून 5 कोटीची नोटीस पाठवली आहे, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रोसचे अकोला जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी मिटकरी यांच्यावर केला आहे.
“52 पत्ते कितीही पिसले तरी त्यातील चार एक्के भाजपकडेच आहेत”; सुधीर मुनगंटीवार
पक्षांतर्गत बोलल्यामुळे नोटीस पाठवली आहे की जे पत्रकार परिषद घेणार आहे, त्यामुळे नोटीस बजावली?, हे माहिती नाही. या नोटीसला मी उत्तर देईलच. परंतु अशा नोटीस कितीही पाठवल्या तरी मी घाबरणार नाही. ‘जे’ सत्य आहे ते जनतेसमोर मीडियातून मांडणं बंद करणार नाही. येणाऱ्या काळात ‘जो’ दिवस ठरला आहे, त्या दिवशी मिटकरी यांच्या घरासमोर पत्रकार परिषद घेईल म्हणजे घेईल, असा इशारा शिवा महोड यांनी मिटकरींना दिला आहे.
“5 वर्षात आंबिल ओढ्याची भिंत बांधता आली नाही आणि रोप वे बांधणार, अन् बसेस पण उडवणार”
सोबतच, माझ्याकडे व्हॉट्सअप चॅटिंग आहे. यात मिटकरींनी कमिशनचे 1 लाख परत केल्याचा दावा केला आहे. मिटकरींनी केशवनगरात घेतलेल्या 80 लाखांत घेतलेल्या भुखंडाचा स्त्रोत काय आहे? 30 लाखांची फोरव्हिलर कुठून घेतली? असा सवाल मोहोड यांनी उपस्थित केला आहे. मिटकरींनी आपल्या चरित्र्यावर केलेले आरोप सिद्ध झाले तर भरचौकात फाशी घेईन, असं देखील मोहोड म्हणाले आहेत.
Read also
- “तुम्ही गोधडीत नव्हता तेव्हापासून आम्ही..”; गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
- “मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव”; केंद्रीय मंत्री अमित शहाचं मराठीत सुचक ट्विट
- “..तर शिवसेना स्टाईलने त्यांचे थोबाड फोडू”; बुलढाण्यातील राड्यानंतर संजय गायकवाडांना शिवसेनेचा इशारा
- एसटीच्या 800 चालकांवर बेरोजगार होण्याची वेळ ; पडळकर, खोत, सदावर्ते कोणत्या बिळात जाऊन लपले ?
- “तुमची विचारधारा काँग्रेस आणि सेनेची आहे ती सांभाळा”; संजय गायकवाड