औरंगाबाद : जिल्हा नियोजन बैठकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि पालकमंत्री संदीपान भूमरे यांच्यात जोरदार शाब्दिक झाली आहे. विरोधातील आमदारांना निधी देत नसल्याचं सांगत अंबादास दानवे बैठकीतच संदीपान भूमरे यांच्यावर भडकले. त्यावर भूमरेंसह मंत्री अब्दुल सत्तार देखील दानवे यांच्यावर भडकले. त्यामुळे बैठकीत मोठा गोंधळ बघायला मिळाला आहे.
हेही वाचा…“आर…दादा आम्ही शरद पवार साहेबांचा आदर करुच, परंतु..,” भाजपचा रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर
औरंगाबाद जिल्हा नियोजन बैठकीत जिल्ह्याधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी जिल्ह्यातील आमदारांसह, अंबादास दानवे, संदीपान भूमरे, अब्दुल सत्तार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी कन्नडच्या एका आमदारांनी एक ही रूपया निधी न दिल्याचा आरोप केला. त्यावर अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतली. यामध्ये संदीपान भूमरे अन् दानवे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यावर अब्दुल सत्तार यांनी देखील उडी घेतल्याने बैठकीत मोठा गोंधळ बघायला मिळाला.
हेही वाचा…“पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न”, वाचा सविस्तर
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांच्या नाराजी नंतरही राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडे देण्यात आल्या. निधी देत नाही म्हणून शिंदे गटाच्या आमदारांची यामुळे कोंडी झाली. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून शिंदे गटाच्या नेत्यांना सातत्याने डिवचण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“देशपातळीवर नरेंद्र मोदींसारखा दुसरा पर्याय मला दिसत नाही”, अजित पवार
हेही वाचा…राहुल गांधी संसदेत पुन्हा परतले, मोदी-शहांना राहुल गांधींची भिती
हेही वाचा…“तोवर तुम्ही औरंग्या, अफजल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा”
हेही वाचा…भुजबळानंतर शरद पवारांच्या निशाण्यावर आता दुसरा मंत्री, कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात पवारांची दुसरी सभा
हेही वाचा…देशातील सर्व विरोधक मुंबईत एकवटणार, महाविकास आघाडीच्या ‘या’ नेत्यांवर मोठी जबाबदारी