मुंबई : आपल्याविरोधात भाजपने जंगजंग पछाडले. पण ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना संपवू शकलेले नाही. हिंदुत्व हे हिंदुत्वच असते. ते व्यक्तीप्रमाणे बदलत नाही. जे आम्हाला बापजाद्यांनी शिकवले आहे, तेच सांगतो. आम्हाला शेंडी जानवण्याचे हिंदूत्व मान्य नाही. मंदिरात घंटा बडवणारे हिंदूत्व आम्हाला मान्य नाही. राष्ट्रवादी हेच आमचे हिंदूत्व आहे. मात्र, त्यांची हिंदुत्वाची व्याख्या काय आहे ? देशात हिंदूना हिंदू आक्रोश मोर्चा काढावा लागतो. हेच त्यांचे हिंदुत्व आहे काय ? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटाला केला आहे. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…मिशन विदर्भ..! अजित पवार गटाचे विदर्भात मेळावे, विदर्भात ताकद वाढवणार
उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदूत्व गुंडाळून ठेवलं आहे. आता प्रभू श्रीरामचंद्रांची उद्धव ठाकरे यांना आठवण येत आहे. राम मंदिराचं भूमीपूजन झालं, तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं राज्यभर गुन्हे दाखल केले होते. हे ते विसरले आहेत. बाळासाहेबांची शिवसेना काॅंग्रेसच्या दावणीला बांधून ठेवली होती. जी प्रामाणिक शिवसैनिकानं मुक्त केली आणि बाळासाहेबांचा भगवा झेंडा पुन्हा अभिमानाने महाराष्ट्रावर फडकला असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“सभागृहात काय फक्त अंड उबवायला जातात का ?” तुपकरांचा गुलाबराव पाटलांना खोचक सवाल
औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसलं आहे. हे महाराष्ट्रातील जनतनं पाहिलं आहे. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरूंग लावला. तसाच सुरूंग जनतेनं तुमच्या सत्तेला लावला. २०२४ सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल. तोवर तुम्ही औरंग्या, अफजल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा कारण लोकांनी तुम्हाला सध्या तेवढचं काम दिलंय. असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भुजबळानंतर शरद पवारांच्या निशाण्यावर आता दुसरा मंत्री, कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात पवारांची दुसरी सभा
हेही वाचा…देशातील सर्व विरोधक मुंबईत एकवटणार, महाविकास आघाडीच्या ‘या’ नेत्यांवर मोठी जबाबदारी
हेही वाचा…“आर…दादा आम्ही शरद पवार साहेबांचा आदर करुच, परंतु..,” भाजपचा रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न”, वाचा सविस्तर
हेही वाचा…ठाकरेंच्या अजून एक मोहरक्यावर गुन्हा दाखल, शिंदेंनी काल इशारा दिला, अन् गुन्हा दाखल