पुणे : केंद्रीय मंत्री अमित शहा काल पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आले असता त्यांनी व्यासपीठावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भरभरून कौतुक केले. अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच आम्ही एकत्र व्यासपीठावर आलो आहोत. अजितदादा तुमच्यासाठी हीच योग्य जागा आहे. पण इथे पोहोचायला तुम्ही उशीर केला. असं अमित शहा यांनी म्हटलं. त्यावर आता अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न”, वाचा सविस्तर
अमित शाहांनी कौतुक केल्यानंतर तुम्हाला का वाईट वाटतंय. आम्ही वडिलधाऱ्यांचा आदर करणारी माणसे आहोत. राज्याच्या विकास करण्याकरता, परिसराचा कायापलट करण्याकरता, आपल्या अनेक समस्या सोडवण्याकरता, लोकप्रतिनिधीची कामं होण्याकरता मी हा निर्णय घेतला आहे. आज देशपातळीवर मला तरी नरेंद्र मोदींसारखा दुसरा पर्याय दिसत नाही. असंही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा…ठाकरेंच्या अजून एक मोहरक्यावर गुन्हा दाखल, शिंदेंनी काल इशारा दिला, अन् गुन्हा दाखल
दरम्यान, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलं काम करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचं देखील विकास होईल. त्यामुळे आम्ही ही भूमिका घेतल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
READ ALSO :
हेही वाचा…राहुल गांधी संसदेत पुन्हा परतले, मोदी-शहांना राहुल गांधींची भिती
हेही वाचा…“तोवर तुम्ही औरंग्या, अफजल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा”
हेही वाचा…भुजबळानंतर शरद पवारांच्या निशाण्यावर आता दुसरा मंत्री, कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात पवारांची दुसरी सभा
हेही वाचा…देशातील सर्व विरोधक मुंबईत एकवटणार, महाविकास आघाडीच्या ‘या’ नेत्यांवर मोठी जबाबदारी
हेही वाचा…“आर…दादा आम्ही शरद पवार साहेबांचा आदर करुच, परंतु..,” भाजपचा रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर