नागपुर : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे गेल्या ३६ दिवसांनी नागपुरमध्ये परतणार आहेत, कारण मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना जेलची हवा खावी लागली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा नागपुर येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र नवनीत राणा यांना ज्या ठिकाणी परवानगी दिली आहे. त्याच ठिकाणी राष्ट्रवादी काॅंग्रेसला देखील परवानगी मिळाली आहे. त्यामुळे नवनीत राणा आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे.
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची नोकरी जाणार? केंद्र सरकारकडून हालचाली सुरू
नवनीत राणा या दिल्लीहुन आज ४ च्या सुमारास नागपुरमध्ये दाखल होणार आहेत. यावेळी त्या रामनगर परिसरातील हनुमान मंदिरात त्या हनुमान चालिसांचं पठण करणार आहेत. त्यावेळी त्यांना पोलिसांनी काही अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत. त्यानंतर त्यांना परवानगी देण्यात आली. मात्र यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसलाही त्याठिकाणी पोलिसांकडून हनुमान चालिस पठण करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे नवनीत राणा यांचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते यावेळी आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
“प्रत्येक आमदारकीची निवडणुक आली की माझ्या नावाची चर्चा होते”; पंकजा मुंडे
नागपुरवरून त्या अमरावतीमध्ये दाखल होणार आहेत. त्यावेळी त्यांचं तिवसा, मोझरी, नांदगाव पेठ याठिकाणी स्वाभिमानी पार्टीकडून जोरदार स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर ते सायंकाळी शेगाव नाका, इर्विन चौक, जयस्तंभ चौक आणि त्यानंतर राजकमल चौक, राजापेठ याठिकाणी त्यांचा जंगी स्वागत केलं जाईल. बडनेरा रोडवरील दसरा मैदान येथील हनुमान मंदिर येथे त्या महाआरती केल्यानंतर हनुमान चालिसाचं पठण करणार आहे.
पार्थ पवारांना राज्यसभेची उमेदवारी देऊन राष्ट्रवादी मवाळमध्ये ताकद वाढवणार का?
दरम्यान, राष्ट्रवादी कार्यालयासमोर राणा यांच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी केली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी ही दोन पैशाचे पोस्टर आणि आमचं तीन लाखाचं पोस्टर असं त्यावर म्हणत राणांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तेथील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
Read also:
- “उद्धव ठाकरेंबाबत बोलताना भान ठेवा नाहीतर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ”; सेनेचा सोमय्यांना इशारा
- “सोमय्यांना ‘अनैतिक’, ‘आक्रस्ताळे’, ‘अजागळ’ सारखे ‘अ’ कारातील विशेषणे लागू पडतात”
- “यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल”? राऊतांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
- “८ वर्षात मी माझं डोकं कुणापुढं झुकू दिलं नाही”; पंतप्रधान नरेंद्र मोदी
- “चंद्रकांत पाटील हे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का”? संजय राऊत भडकले