मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि नाशिक दौऱ्यावर आले आहेत. मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जवळपास ३० हजार ५०० कोटींहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांची भेट देणार आहेत. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २१, २०० कोटी रूपये खर्च करून मुंबईत उभारण्यात आलेल्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करणार आहेत. त्यावरून आता ठाकरे गटाकडून जोरदार टिका करण्यात आलीय.
हेही वाचा…घाटी रूग्णालयात २ गटात राडा, महिला डॉक्टराचं डोके फुटले, सीसीटीव्ही व्हिडीओ समोर, शरद पवार गटाची जहरी टिका
अटल सेतूची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबरोबर अनेकवेळा पाहणी केली आहे. आता तेच सरकारला खुपतं. त्यामुळे दुखतं तिथे खुपतं. म्हणून आम्हाला निमंत्रण दिलं नाही. जेवढे मिंधे त्यांना निमंत्रण अन् खंद्यांना निमंत्रण नाही, असा त्याचा अर्थ, अशी टिका खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर केली आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिघा रेल्वे स्थानकाचंहं आज उद्घाटन केलं जात आहे. परंतु या कार्यक्रमासाठी ठाकरे गटाच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं नाही. त्यावरून ठाकरे गट याठिकाणी आक्रमक झाला आहे.
हेही वाचा…नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा, इतिहासात प्रथमच देशाचे पंतप्रधान देणार रामकुंड येथे भेट
दरम्यान, दिघा रेल्वे स्थानकाचंहं आज उद्घाटन केल जात असून कार्यक्रमासाठी खासदार राजन विचारे यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे राजन विचारे थेट रेल्वे स्थानकावर पोहचले. राजन विचारे येताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदी मोदीच्या घोषणा दिल्या. तर समोरूनही काॅंग्रेस काॅंग्रेस अशा घोषणा देण्यात आल्या. यामुळे त्याठिकाणी थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
READ ALSO :
हेही वाचा…“बाळासाहेब ठाकरेंचं राम मंदिरांचं स्वप्न मोदींनी पुर्ण केलं,” एकनाथ शिंदेंचं नाशकात मोठं विधान
हेही वाचा…खोके सरकारच्या काळात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले, दोन गटाच्या राड्यात महिला डॉक्टराचं डोकं फुटलं
हेही वाचा…“माता, बहिणी मुलींवर शिव्या देऊन नका, अपशब्द वापरू नका”, नरेंद्र मोदींचं मोठं आवाहन
हेही वाचा…“स्वत: न केलेल्या कामाचं क्रेडिट कोण घेतंय?” मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडच्या उद्घाटनावरून ठाकरे गटाचा सवाल
हेही वाचा…“एका प्रामाणिक सहकाऱ्याला गमावलं”, युवा संघर्ष यात्रेतला हृषिकेश म्हस्के यांचं निधन, रोहित पवारांकडून भावपूर्ण श्रद्धांजली