नाशिक : आजचा दिवस भारताच्या युवा शक्तीचा दिन आहे. देशातील प्रत्येक तरूण त्यांच्या निष्ठेने आणि सक्षम भारतासाठी प्रयत्न करेल. तरूणांनी काही सुत्रावर ध्यान दिलं पाहिजे. मेड इन इंडिया प्रोडक्ट वापरा, कोणतीही नशा, ड्रग्जपासून लांब रहा. माता, बहिणी मुलींवर शिव्या देऊन नका. अपशब्द वापरू नका. असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने नाशकात तरूणांना केलं. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी प्रसिध्द काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं. तर गोदाकाठी आरतीही केली. यातच नरेंद्र मोदी यांचा नशकात भव्य रोड शो देखील पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतूक केलं.
हेही वाचा…नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा, इतिहासात प्रथमच देशाचे पंतप्रधान देणार रामकुंड येथे भेट
नाशिकच्या पावनभूमित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्याची संधी आम्हाला दिल्याबाबत त्यांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमधील पावत्र भूमित आले. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरासाठी हा शुभ संकेत आहे. अयोध्येत राम मंदिर बनवण्याचं स्वप्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि करोडो नागरिकांचं होतं. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुर्ण केलं. मोदी है तो मुमकीन है. असं म्हणत मोदी लक्षद्वीपला गेले तर मालदीवमध्ये भूंकप आला. आपल्या देशाकडे वाईट नजरेने पाहण्याची हिंमत कुणाचीही नाही. भारताचा डंका जगभरात वाजत आहे. असेही शिंदे म्हणाले.
हेही वाचा…नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा, इतिहासात प्रथमच देशाचे पंतप्रधान देणार रामकुंड येथे भेट
दरम्यान, देशाची युवा पिढी तयार होत आहे. गुलामी आणि तणावापासून मुक्त आहे. आता युवा पिढी म्हणते विकास आणि विरासत. सरकारने अनेक योजना राबवून देशाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवला. भारत ही लोकशाहीची माता आहे. जर तुम्ही सक्रीय राजकारणात आलात तर परिवारवादाच्या राजकारणाला कमी करा. परिवादाच्या राजकारणाने देशाचं नुकसानं केलंय. असं म्हणत त्यांनी काॅंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
READ ALSO :
हेही वाचा…खोके सरकारच्या काळात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले, दोन गटाच्या राड्यात महिला डॉक्टराचं डोकं फुटलं
हेही वाचा…“माता, बहिणी मुलींवर शिव्या देऊन नका, अपशब्द वापरू नका”, नरेंद्र मोदींचं मोठं आवाहन
हेही वाचा…“स्वत: न केलेल्या कामाचं क्रेडिट कोण घेतंय?” मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडच्या उद्घाटनावरून ठाकरे गटाचा सवाल
हेही वाचा…“एका प्रामाणिक सहकाऱ्याला गमावलं”, युवा संघर्ष यात्रेतला हृषिकेश म्हस्के यांचं निधन, रोहित पवारांकडून भावपूर्ण श्रद्धांजली
हेही वाचा…घाटी रूग्णालयात २ गटात राडा, महिला डॉक्टराचं डोके फुटले, सीसीटीव्ही व्हिडीओ समोर, शरद पवार गटाची जहरी टिका