पुणे : महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारशी केलेल्या पत्रव्यवहाराबाबत आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रकाश टाकून विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या भूमिकेची आठवण करून दिली. यावेळी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सरकार त्याच्या पाठीशी आहे असा आत्मविश्वास निर्माण होईल असे काम राज्य सराकारने करावे अशी आग्रही मागणी अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली.
अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे
आज पुणे शहर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा मुद्दा माध्यमांसमोर मांडला. राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे त्यावर बोलताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या एका पत्राचा उताराच वाचून दाखवला. हे पत्र वाचून झाल्यावर विरोधी पक्षनेते म्हणाले की, या पत्रातील उद्धव ठाकरे यांचे नाव बाजूला करून त्याठिकाणी विद्यमान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे नाव टाकावे लागेल, असा चिमटा त्यांनी काढला. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी केलेले आवाहन आज जशास तसे लागू होते. आज देवेंद्र फडणवीस स्वत: अर्थमंत्री, नियोजन मंत्री व उपमुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस मिळून चांगले सरकार चालवत आहेत असा त्यांचा ग्रह आहे. त्यामुळे आता त्यांनी लोकांना मदत करून संकटातून बाहेर काढावे, अशी आग्रही मागणी अजित पवार यांनी केली.
“राष्ट्रवादीने २३ वर्षात साडेसतरा वर्ष सत्तेत राहून जनसेवा केली”
सुमारे २२ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असलेला एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात होणे अपेक्षित असतांना सदरचा प्रकल्प गुजरातला होत आहे. महाराष्ट्रात येणारे अनेक महत्वाचे प्रकल्प हे इतर राज्यात पळविले जात आहे, ही बाब महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अतिशय चिंताजनक बाब आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिक येथे माध्यमांशी बोलताना दिली. महाराष्ट्राच्या हितासाठी दिल्लीत काम करणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक कशी येईल यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सद्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून दिल्लीत आपल वजन वापरून यापुढे तरी किमान कुठलाही प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही. तसेच अधिक गुंतवणूक येईल याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
“मिंधे-फसनवीस सरकारने आता ‘जय जय गरवी गुजरात’ हा नारा बुलंद द्यावा”; सेेनेची जहरी टिका
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला लवकरच मोठा प्रकल्प केंद्राकडून गिफ्ट मिळणार आहे, असे सांगितले. मात्र एकामागे एक प्रकल्प इतरत्र जात आहे. याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असून देशाचे नेते हे संपूर्ण राष्ट्राचे नेते आहे. त्यांनी केवळ गुजरातचे नेते म्हणून मर्यादित राहू नये, असा टोला छगन भुजबळ यांनी यावेळी लगावला.
Read also
- “कोणत्याही पदावर नसलेल्या राणांना सुरक्षा अन् माझी सुरक्षा काढली”; विजय वडेट्टीवार
- “कारण नसताना जेरीस आणण्याचा डाव असेल तर मी त्याला बळी पडणार नाही”
- “केंद्रीय यंत्रणांचा सुळसुळाट करून राज्य तपास यंत्रणांना मोदी सरकार निष्प्रभ बनवताहेत”
- “केंद्रातील लाड पुरवता पुरवता भाजप महाराष्ट्राला भिकेला लावणार”
- “खेकड्यांची चाल लोकं स्विकारत नाही, हिमंत असेल तर याचा पुरावा द्या”; रोहित पवार